साकवाळ, सावरफोंड येथील राष्ट्रीय मार्गावर झालेल्या तीन वाहनांचा अपघात. Dainik Gomantak
गोवा

Goa: सावरफोंड-सांकवाळ येथे भीषण अपघात

जिवीतहानी झालेली नाही.

Rohit Hegade

वास्को: सावरफोंड-सांकवाळ येथे दोन स्विफ्ट या चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. अपघातात एक महिला पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) जखमी झाली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दरम्यान तीनही कारमधील व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. अपघातातील जखमींना उपचारांसाठी तातडीने गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आले.

कुठ्ठाळीहून वास्कोच्या (Vasco) दिशेने जाणाऱ्या लाल रंगाचा स्विफ्ट कारने वास्कोहून कुठ्ठाळीच्या दिशेने येणाऱ्या दोन स्विफ्ट डिझायर कारला ठोकर दिल्याने हा अपघात घडला. हा अपघात शनिवारी संध्याकाळी सुमारे 4 वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी दिली.या अपघातात एक महिला पोलीस उपनिरीक्षक जखमी झाली.

अपघात एवढा भीषण होता, की यात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लाल रंगाच्या स्विफ्ट कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला तर इतर दोन स्विफ्ट डिझायर कारच्या उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वेर्णा पोलिसांनी अपघातस्थळी येऊन वाहनांचा पंचनामा करून वाहतूकीसाठी मार्ग सुरळीत केली. अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी येऊन जखमींना वाहनातून बाहेर काढले.

त्वरित पोलिस (police) व 108 रुग्णवाहिकेला (ambulance) संपर्क केला. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी अपघातस्थळी वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर, वेर्णा पोलिस स्थानकाचे अधिकारीवर्ग दाखल झाले. अपघात झाल्याने दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी अपघात झालेल्या वाहनाचा पंचनामा करून सर्व वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT