कासव गोमन्तक फोटो
गोवा

Goa : नवीन सीझेडएमपी आराखड्यातून कासव पैदास केंद्रे गळाली

मांद्रे आणि गालजीबाग केंद्रे नकाशातून गायब, मोरजीत दाखविली बोटी ठेवण्याची जागा (Goa)

सुशांत कुंकळयेकर

मडगाव ः (Goa)पश्चिम किनारपट्टीत केरळ ते गुजरात हा समुद्रीपट्टा ऑलिव्ह रिडले कासवांचे महत्त्वाचे अधिवासक्षेत्र मानले जात असून गोव्यात उत्तरेत मांद्रे आणि मोरजी तर दक्षिणेत गालजीबाग व आगोंद हे किनारे महत्त्वाची कासव पैदास केंद्रे म्हणून आरक्षित केली असली तरी गोव्याच्या नव्या किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यात मांद्रे आणि गालजीबाग या किनाऱ्यावरील कासव पैदास केंद्राच्या जागाच न दाखविल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पर्यटन व्यावसायिकांच्या दबावाखाली या कासवांचा गळा घोटायला हे सरकार पुढे आल्याचा आरोप होत आहे. या शिवाय मोरजी आणि गालजीबाग येथे बंदर परिसीमा क्षेत्र या कासव पैदास केंद्रांवर अतिक्रमण करणारी असून त्यामुळे गोव्यात आधीच कमी होत असलेली ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या आणखीनच कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यामुळे किनारपट्टीवर अतिक्रमण होऊन वाळूच्या टेकड्या नाहीशा होतील. दर्यातील कोलाहल वाढण्याबरोबरच प्रदूषणही कैकपटीने वाढेल. त्यामुळे सागरातील सरपटणारे प्राणी, कासवे, डॉल्फिन आणि अन्य जाती नामशेष होण्याची भीती मोरजी टर्टल ट्रस्टच्या व्यवस्थापकीय ट्रस्टी सरिता फर्नांडिस यांनी सांगितले. मडगाव येथील रेनबो वॉरियर्स या पर्यावरण रक्षण संघटनेचे निमंत्रक अभिजित प्रभुदेसाई म्हणाले, २०११ च्या सीआरझेड अधिसूचनेत अंडी घालण्यास येणाऱ्या माद्या वाहनांचे आवाज, उजेड, आवाज, तसेच लोकांची गर्दी यामुळे विचलित होतात. त्यामुळे अंडी घालण्यास त्या येत असलेल्या जागा या साऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. जर या जागा बंदर परिसीमा क्षेत्रात आल्यास या जागा सुरक्षित ठेवणे शक्य नाही असे ते म्हणाले.

  • का करायला पाहिजे कासवांचे संवर्धन
    - कासवांची १००० पिल्ले जन्माला आली तर त्यातील फक्त १ पिल्लूच मोठे होऊन पुन्हा प्रजनन करू शकते. त्यामुळे पिल्ले कमी होऊ नयेत यासाठी किनाऱ्यावर ते जिथे अंडी घालतात त्या जागा सुरक्षित ठेवण्याची गरज असते.
    - ऑलिव्ह रिडले तसेच अन्य जातीची कासवे दरवर्षी त्याच जागेवर पुन्हा अंडी घालण्यास येतात. त्यांच्या जागा बदलल्या तर प्रजनन साखळीवर परिणाम होऊ शकतो
    - गोव्यात २५.५४ हेक्टर क्षेत्र कासवांची अंडी घालण्याच्या जागा आहेत. हे क्षेत्र गुजरात, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांच्या तुलनेत बरेच कमी आहे. गोव्यात कासव पैदास केंद्रांसाठी अधिसूचित केल्या आहेत तिथे ५० ते ६० जागांवर कासवे अंडी घालायला येत असतात. त्यामुळे हा संपूर्ण पट्टा अतिशय संवेदनशील क्षेत्र मानले गेले आहे.

    गोव्यात सगळेच आलबेल नाही
    - गोव्यातील समुद्री वातावरण कासवे आणि इतर जलप्राणीसृष्टीसाठी सुरक्षित नाही. प्रत्येक वर्षी बरीच कासवे समुद्रकिनारी मेलेल्या किंवा जखमी अवस्थेत आढळून येतात.
    - जून २०१७ ते जून २०२१ या कालावधीत गोव्यात फक्त ४८० कासवांची पिल्ले दिसून आली.
    - महामारीच्या काळात मात्र ही पैदास वाढल्याचे लक्षात आले. आगोंद येथे ३२ ठिकाणी तर मोरजी येथे २० ठिकाणी कासवांनी अंडी घातली.

    पर्यावरण कार्यकर्ते म्हणतात हे करा

    - किनारपट्टीची गर्दी पेलण्याच्या शक्तीचा आधी अभ्यास करा
    - कासवांची पिल्ले अधिक प्रमाणात जगतील कशी त्यावर लक्ष द्या
    - कासवे आणि माणसे यांच्या किनारपट्टीवरील वावराचा समतोल साधा
    - किनारपट्टीवर दुचाक्यांच्या वावरावर नियंत्रण आणा
    - कासव पैदास केंद्रापासून जलक्रीडा प्रकार आणि ट्रॉलर याना दूर ठेवा
    - एक वापरी प्लास्टिक वापरावर बंदी आणा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT