गोमंतकीयांच्या ताटांत मासळी नाहीच!

गोमंतकीय खवय्यांचा हिरमोड; समुद्र खवळलेला असल्याने अद्याप ट्रॉलर दर्याकिनारे
गोमंतकीयांच्या ताटांत मासळी नाहीच!
गोमंतकीयांच्या ताटांत मासळी नाहीच!Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी/मडगाव: राज्यातील (Goa) मासेमारी (Fishing) बंदी उठून 5 दिवस उलटले असले, तरी दर्या अजूनही खवळलेलाच असल्याने अद्याप एकही ट्रॉलर खोल समुद्रात गेलेला नाही. आणखी काही दिवस ट्रॉलर समुद्रात जाणार नाहीत अशी माहिती मच्छीमार (Fisherman) खात्याने दिली आहे. त्यामुळे गोमंतकीयांच्या ताटात अजून काही दिवस ताजे मासे पडण्याची शक्यता कमीच आहे. दुसऱ्या बाजूने याच दिवसात मिळणारी सोलर कोळंबी हातची जाईल या भीतीने लहान होडीवाले आपला जीव धोक्यात घालून खवळलेल्या दर्यात होड्या घेऊन जात आहेत. त्यांना कोळंबी मिळते, पण कित्येक बोटी लाटांच्या तडाख्याने फुटून नुकसान झाले आहे. (Lifting of fishing ban in Goa not single trawler has gone deep into sea)

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मच्छीमार मासेमारीसाठी सज्ज झाले होते. पाच बंदरात तब्बल 913 ट्रॉलर मासेमारीसाठी तयारीत आहेत. मात्र, समुद्रात वाऱ्याचा जोर वाढला असल्याने समुद्र खवळला आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर होत असल्याचे अधीक्षक मेघा केरकर यांनी सांगितले.

गोमंतकीयांच्या ताटांत मासळी नाहीच!
ओळखपत्र नसलेल्या भारतीय, नेपाळी, परदेशी नागरिकांसाठी पणजीत लसीकरण

स्वतः मच्छीमार असलेले वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 20 ट्रॉलरच मासेमारीसाठी दर्यात गेलेले असून त्यातील फक्त एक लहान ट्रॉलर पुन्हा जेटीवर आला आहे. त्यामुळे कुटबण जेटीवर अजूनही माशांची आवक जावक सुरू झालेली नाही. या जेटीवरून किमान 200 ट्रॉलर मासेमारीसाठी सोडले जातात. सध्या साळ नदीच्या मुखावर रेतीचा पट्टा तयार झाल्याने येथून दर्यात ट्रॉलर नेणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे बहुतेक ट्रॉलर जेटीवरच उभे करून ठेवणे पसंत केले आहे.

पाळोळेत बंपर मासेमारी

गेल्या पाच-सहा दिवसांपासून पाळोळे किनाऱ्यावर कोळंबी, करमट व बांगडे यांची बंपर मासेमारी करण्यात आली आहे. बुधवारी पाळोळे समुद्रात बांगड्याची बंपर मासेमारी झाली. त्यामुळे काणकोणात माशांचे दर पन्नास टक्क्यांनी घटले. कोळंबी 250 रुपये किलो, तर बांगडे शंभर रुपयांना दहा ते बारा नग अशी विक्री झाली.

गोमंतकीयांच्या ताटांत मासळी नाहीच!
Goa:गोवा केंद्रातील नेत्यांना विकण्याचा डाव

कर्नाटक आणि तमिळनाडूत ट्रॉलर्सना विनाव्हॅट डिझेल पुरविले जाते. गोवा सरकारकडून तशी व्यवस्था केली जावी. व्हॅट माफ झाल्यास काही प्रमाणात मासेमारीला दिलासा मिळेल. एकीकडे खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे दराबाबत निश्‍चितता नाही. कामगार येत नाहीत. त्याचा परिणाम मासेमारीवर होत आहे.

- हर्षद धोंड, अध्यक्ष ट्रॉलर्स संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com