Suleman Khan Escape Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Escape: सुलेमान पळून जाण्यामागे पोलिसांचा हात, 'काँग्रेस'चा नेम कोणावर?

Sunil Kauthankar on Suleman Khan Case: अमित नाईकच्या डोक्यावर कुणा बड्या माणसाचा हात असल्याचा दावा गोवा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कंवठणकर यांनी केला आहे

Akshata Chhatre

भूबळकाव प्रकरणातील मास्टरमाईंड सिद्दीकी उर्फ सुलेमान याने पोलिस कोठडीतून पलायन केले, आणि यात त्याला मदत केल्याबद्दल आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याला पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे मात्र सुलेमान खानला पळून जायला मदत केलेल्या अमित नाईकच्या डोक्यावर कुणा बड्या माणसाचा हात असल्याचा दावा करत गोवा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कंवठणकर यांनी गोवा राज्य सरकार आणि पोलिसांवर थेट निशाणा साधला आहे.

क्राईम ब्रांचच्या तावडीतून एवढ्या सहजसहजी पळून जाणं सोपं नाही, मात्र ज्याप्रकारे अमित नाईक या कॉन्स्टेबलने पोलिसांची नजर चुकवून त्याला बाहेर काढलं त्याअर्थी नक्कीच कुठल्यातरी मोठ्या माणसाचा यामागे हात आहे, या संपूर्ण खेळाचा खरा मास्टरमाइंड कोणी भलताच आहे असा थेट वार कंवठणकरांनी केलाय.

इथेच न थांबता कवठणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी पदावरून राजीनामा द्यावा कारण सध्या गोव्याचं रूपांतरण गँग्स ऑफ वासेपूर' मध्ये होतंय असे खडे बोल कंवठाणकरांनी सुनावले आहेत.

गोव्यातील कायदा मुळीच सुव्यवस्थित नाही, यामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.आम्ही डीजीपीची भेट घेतली आहे आणि सिद्धिकी उर्फ ​​सुलेमान खानच्या संदर्भात गुन्हे शाखेकडे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची मागणी केलीये असं रोखठोक वक्तव्य गोवा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कंवठणकर यांनी केले आहे.

सुलेमानला पोलिसांची धमकी?

"माझा एन्काउंटर करण्याची धमकी दिली. गुन्हे शाखेच्या कोठडीत मला जबर मारहाण केली. तसेच, माझ्या घराची मोडतोड केली. शिवाय मला हुबळीला पोलिसांनीच आणून सोडले', असा खळबळजनक खुलासा कोठडीतून फरार झालेल्या जमीन हडप प्रकरणाचा मास्टरमाईंड सुलेमान खान याने केला होता. सुलेमान खान याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, यात त्याने गोवा पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. सुलेमान खान याचा हा व्हिडिओ सुनिल कंवठणकर यांनी प्रसिद्ध केल्यानंतर बराच व्हायरल होत होता.

आपकडून सुद्धा फुटेजची मागणी

फक्त काँग्रेस नाही तर आपने सुद्धा गुन्हा शाखेकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. सुलेमान खान पळून जाण्याआधीच्या तीन दिवसांचे फुटेज, खास करून एसपीच्या केबिनच्या आसपासचं फुटेज द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT