Goa Company Dainik Gomantak
गोवा

Goa Company: तुयेतील बंद कंपन्या सुरु करा; अन्यथा जमिनी परत घेऊ!

Goa Company: स्थानिकांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी तुये औद्योगिक वसाहतीसाठी घेतल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

goa company: तुये औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या कंपन्या त्या कंपन्यांच्या मालकांनी पूर्ववत सुरू कराव्यात, अन्यथा त्यांना दिलेल्या औद्योगिक वसाहतीतील जमिनी परत घेऊन इच्छुक कंपन्यांना देण्यात येईल, असा इशारा गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड (Alex Reginald) यांनी दिला आहे.

तुये औद्योगिक वसाहतीला आलेक्स रेजिनाल्ड यांनी काल भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार जीत आरोलकर, तुयेच्या सरपंच सुलक्षा नाईक, उपसरपंच नीलेश कांदोळकर, माजी पंच आनंद साळगावकर, दयानंद मांद्रेकर उपस्थित होते.

स्थानिकांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी तुये औद्योगिक वसाहतीसाठी घेतल्या आहेत. शिवाय आता विस्तार करण्यासाठीही आणखी लाखो चौरस मीटर जमिनी घेतल्या आहेत. तसेच तुये इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पासाठीही स्थानिकांच्या जमिनी घेतल्या आहेत. त्या बदल्यात स्थानिकांना आजपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत.

या औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे सर्व कंपन्यांचे अधिकारी स्थानिक बेरोजगार युवकांना संधी देण्याऐवजी बिगर गोमंतकीयांना संधी देत आहेत, अशी कैफियत यावेळी स्थानिक नागरिक व पंचायत मंडळाने आलेक्स रेजिनाल्ड यांच्याकडे मांडली.

आपण या सर्व औद्योगिक वसाहतीसंबंधी पूर्ण माहिती गोळा करणार आहे आणि किती कामगार कोणत्या कंपनीत कार्यरत आहेत. स्थानिकांना कशा पद्धतीने रोजगार मिळायला हवा. यासंबंधी त्या त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे चर्चा करणार आहे.

शिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मजूरमंत्र्यांकडे चर्चा करून हे प्रश्न सोडवणार आहे, अशी ग्वाही यावेळी रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली. आमदार जीत आरोलकर यांनी यावेळी चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड यांच्याकडे चर्चा करताना स्थानिकांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी गेलेल्या आहेत. त्या स्थानिकांना रोजगार मिळायला हवेत.

सध्या तुये औद्योगिक वसाहतीमध्ये काही मोजक्याच कंपन्या उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत, परंतु त्या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी दिल्या जात नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. यातही सरकारने आणि रेजिनाल्ड यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

नवीन जोड मार्गाची गरज

तुये औद्योगिक वसाहतीमध्ये मोठमोठ्या कंपन्या येण्यासाठी आणि त्या कंपन्यांना लागणारे साहित्य आणणाऱ्या अवजड वाहनांसाठी खास मार्ग नसल्याने गावातून जाणाऱ्या अरुंद रस्त्याचा त्यासाठी वापर केला जात आहे.

त्यामुळे सरकारने धारगळ राष्ट्रीय महामार्ग ६६ ते तुये इलेक्ट्रॉनिक्स सिटी ते थेट औद्योगिक वसाहतीपर्यंत नवीन जोड रस्ता तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी: सरकारने यापूर्वी मोठ्या प्रमाणात तुये औद्योगिक वसाहतीसाठी स्थानिकांच्या जमिनी घेतल्या, परंतु त्यांना रोजगार तर दिला नाहीच, शिवाय काहींनी कंपन्या उभ्या केल्या आणि सरकारची सबसिडी घेऊन गायब झाल्या. नवीन कंपन्या येतात, परंतु स्थानिकांना रोजगाराची संधी दिली जात नाही. ज्यांच्या जमिनी या वसाहतीसाठी गेल्या आहेत, त्यांना रोजगार द्यावा, अशी मागणी उपसरपंच नीलेश कांदोळकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT