Tuber Vegetables Market Dainik Gomantak
गोवा

Tuber Vegetables Market: कंदमुळांना आता 'भाव' येणार! आवक घटली; पाऊस आणि रानटी जनावरांचा उत्पादनाला फटका

Goa Tuber Vegetables Market: औषधी गुणधर्म असलेली विविध कंदमुळे बाजारात विक्रीस दाखल झाली असली, तरी यंदा त्यांची आवक कमी आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: औषधी गुणधर्म असलेली विविध कंदमुळे बाजारात विक्रीस दाखल झाली असली, तरी यंदा त्यांची आवक कमी आहे. पिकाच्या ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय हत्तींसह रानटी जनावरांकडून झालेल्या नासधुशीचाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी काळात कंदमुळांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

सध्या डिचोली बाजारात अळूची माडी, काटेकणगी, सुरण आणि कारांदे विक्रीस उपलब्ध आहेत. मात्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण कमी आहे. दरवर्षी या काळात कंदमुळांनी बाजारपेठ गजबजून जाते; यंदा मात्र अद्याप अपेक्षित आवक झालेली नाही.

आवक कमी असली तरी सध्या कंदमुळांचे दर स्थिर आहेत. आकारानुसार अळूची माडी १०० ते २०० रुपये नग, तर काटेकणगी १०० ते २०० रुपये वाटा दराने विकला जात आहे. काही विक्रेते अळूची माडी तसेच अन्य कंदमुळे सुमारे ६० रुपये किलो दरानेही विकत आहेत.

ऐन पिकाच्या काळात पाऊस कमी झाल्याने यंदा कंदमुळांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा बाजारातील आवक कमी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

रानटी जनावरांकडून नासधूस

गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकातील जांबोटी, कणकुंबी आदी भागातील कंदमुळांनीही डिचोली बाजारपेठेत स्थान मिळविले आहे.

आठवडी बाजाराच्या दिवशी कर्नाटकातील कंदमुळांचा स्वतंत्र बाजार भरतो. स्थानिक विक्रेतेही ते घाऊक दराने खरेदी करून विक्री करतात.

यंदा कर्नाटकातूनही अपेक्षित प्रमाणात आवक झालेली नाही. एका बाजूला कमी पाऊस तर दुसऱ्या बाजूला रानटी जनावरांचा उपद्रव.

सध्याचे दर

अळूची माडी : १०० ते २०० रुपये नग (आकारानुसार)

काटेकणगी : १०० ते २०० रुपये वाटा

कारांदे : ८० ते १०० रु. किलो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accidents: गोव्यात रस्तेअपघातांचा वेग वाढला; 280 दिवसांत 204 बळी, मागील वर्षाच्या तुलनेत 10 ने अधिक

Nana Patekar Death: क्रिकेटच्या किंगकडून सिनेसृष्टीच्या दिग्गजाला सलाम; नाना पाटेकरांसाठी विराटची भावुक पोस्ट

India vs West Indies: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20साठी टीम इंडियात मोठा बदल

Nana Patekar Virat Kohli Fan: “विराट आऊट झाल्यावर जेवणाचा मूड जायचा”, नाना पाटेकर होते कोहलीचे डाय हार्ड फॅन; क्रीडा जगतानेही गमावला एक सच्चा चाहता

Nana Patekar Funeral In Pune: नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात होणार अंत्यसंस्कार; डोणजे गावातील शेतातच शेवटचे विधी करण्याची होती अभिनेत्याची इच्छा

SCROLL FOR NEXT