Trinamool Congress Goa Dainik Gomantak
गोवा

Trinamool Congress Goa: सरकार जाहीरनाम्यात दिलेलं व सध्‍या विस्‍मृतीत गेलेलं मोफत सिलिंडरचं आश्‍‍वासन कधी पूर्ण करणार?

तृणमूलची मागणी : गॅस सिलिंडरचे दर निम्मे करा

गोमन्तक डिजिटल टीम

Trinamool Congress Goa घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करून उपयोगाचे नाही तर सिलिंडरचे दर निम्म्यावर आणा, अशी मागणी तृणमूल काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस राखी नाईक प्रभुदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी सहसंयोजक समील वळवईकर आणि टीएमसी अल्पसंख्याक विभागाच्या समन्वयक सुल्‍ताना शेख उपस्थित होत्‍या. एलपीजी गॅस सिलिंडरचे दर निम्म्याने कमी करण्याबरोबर पेट्रोलियम उत्पादने, पेट्रोल, डिझेल आणि अन्नधान्यांचे दरही कमी करणे गरजेचे आहे.

राज्‍यातील भाजपने आपल्‍या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले व सध्‍या विस्‍मृतीत गेलेले तीन मोफत सिलिंडरचे आश्वासन पूर्ण करावे, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. तसेच केंद्राने गॅस सिलिंडरचे दर किमान 500 रुपयांनी कमी करावेत, अशी मागणीही त्‍यांनी केली.

घरगुती गॅस सिलिंडरवर 200 रुपये कपातीची महिला भगिनींसाठी रक्षाबंधन भेट म्हटल्याबद्दल भाजप सरकारवर जोरदारपणे टीका करताना प्रभुदेसाई म्हणाल्या की, गेल्या नऊ वर्षांपासून सिलिंडरच्‍या दरात जवळपास 160 टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे.

या नऊ वर्षांच्या कालावधीत नऊ वेळा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. मात्र एवढ्या वर्षात ही भेट आम्हाला कधी मिळाली नाही, असा टोला हाणून सिलिंडरच्या किमतीत किरकोळ 200 रुपयांनी केलेल्या कपातीला ‘भेट’ म्हणता येणार नाही, कारण भेट नेहमी मोफत असते, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

पाच राज्यांतील आगामी निवडणुकांचे मार्केटिंग करण्यासाठी भाजप सरकारने जनतेला दिलेले हे ‘गिफ्ट व्हाउचर’ आहे.

कारण येत्या पाच महिन्यांत मिझोराम, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा येथे विधानसभा निवडणुका तसेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे.

म्हणूनच केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्‍या दरात 200 रुपयांची किरकोळ कपात करून मतदारांना गाजर दाखविले आहेत.

- राखी नाईक प्रभुदेसाई, तृणमूलच्‍या प्रदेश सरचिटणीस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT