Vaping Devices ई-सिगारेटच्या विक्रीला देशात पूर्णत: बंदी आहे. तरी देखील काही ठिकाणी या सिगारेट विकल्या जातात. या व्यसनाची सवय लागली तर ती सोडविणे अतिशय कठीण होते. तसेच त्यामुळे ती व्यक्ती इतर व्यसनांकडे आकर्षित होते.
त्यामुळे ई-सिगारेटवर बंदी आली तर ड्रग्ससारख्या व्यसनात घट होईल. सिगारेट ही ड्रग्सकडे वळण्याची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन कॅन्सरतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी केले.
दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात आयोजित ‘ई-सिगारेटचे दुष्परिणाम’ या विषयावर डॉ. साळकर बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलिस अधीक्षक सुचिता देसाई उपस्थित होत्या.
डॉ. साळकर म्हणाले, ई-सिगारेटमध्ये मोठ्या प्रमाणात निकोटीन तसेच आरोग्यास हानिकारक ठरणारी इतर रसायने असतात. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आकारात तसेच विविध फ्लेवरमध्ये या सिगारेट विकल्या जातात.
कोणतेही व्यसन हे प्रामुख्याने १५ ते ३० वर्षाच्या आत लागते. त्यामुळे या काळात मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. या व्यसनांचे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक परिणामही उद्भवतात. त्यामुळे अशा व्यसनांपासून दूर राहणेच शहाणपणाचे, असेही ते म्हणाले.
तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आकारात तसेच विविध फ्लेवरमध्ये ई-सिगारेट विकल्या जातात. कोणतेही व्यसन हे प्रामुख्याने १५ ते ३० वर्षाच्या आता लागते. या व्यसनांचे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक परिणामही उद्भवतात. त्यामुळे अशा व्यसनांपासून दूर राहणेच शहाणपणाचे.
डॉ. शेखर साळकर, कॅन्सरतज्ज्ञ
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या या असतातच. परंतु त्यावर व्यसन हा पर्याय नाही. जर आपल्याला व्यसन लावायचे असेल तर ते नावीन्यपूर्ण गोष्टींचे लावा. आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला आनंद देऊ शकतात. व्यसनांना दूर सारा.
- सुचेता देसाई, पोलिस अधीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.