goa transport department speed governor notice Dainik Gomantak
गोवा

'स्पीड गव्हर्नर'बद्दल कडक भूमिका, वाहतूक खात्याकडून पाहणी; टॅक्सी, भाडोत्री वाहने 'रडार'वर

goa transport department speed governor notice: टॅक्सी आणि भाडेतत्त्वावरील प्रवासी वाहनांवर वाहतूक संचालनालयाने कडक भूमिका घेतली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील टॅक्सी आणि भाडेतत्त्वावरील प्रवासी वाहनांवर वाहतूक संचालनालयाने कडक भूमिका घेतली असून, वेगमर्यादा नियंत्रक यंत्र न बसवलेल्या किंवा बसवूनही ते कार्यरत नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अशा वाहनांचे परवाने निलंबित करणे किंवा रद्द करणे यासह कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सूचनेत म्हटले आहे.

वाहतूक खात्याने अशा वाहनांची तपासणी करणे सुरू केले आहे. वाहतूक न विभागाच्या निदर्शनास आले आहे की, राज्यातील अनेक व्यावसायिक प्रवासी वाहनांमध्ये वेगमर्यादा नियंत्रक यंत्र बसवलेले नाही. काही वाहनांमध्ये हे यंत्र बसवले असले तरी ते बंद अवस्थेत किंवा निकामी असल्याचे आढळून आले आहे. ही बाब मोटार वाहन नियमांचे उल्लंघन असल्याने विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वेगमर्यादा नियंत्रक यंत्र महत्त्वाचे मानले जाते. वाहनाचा वेग निश्चित मर्यादेपेक्षा वाढू नये यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. विशेषतः प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अशा यंत्राची सक्ती करण्यात आली आहे. मात्र काही वाहनमालक आणि चालक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

संचालनालयाने सर्व वाहनमालकांना आपल्या वाहनांमधील वेगमर्यादा नियंत्रक यंत्राची तातडीने तपासणी करून ते योग्यरीत्या कार्यरत असल्याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

तपासणीदरम्यान नियमभंग आढळल्यास संबंधित वाहनांविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

रस्ते सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि प्रवाशांचे जीव सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे. त्यामुळे राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येण्याची शक्यता असून, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वेर्ण्यात भीषण दुर्घटना! धावत्या मिनी टेम्पोवर कोसळली उच्चदाब वीजवाहिनी; 30 वर्षीय क्लिनरचा जागीच मृत्यू

Horoscope: शनीची उलटी चाल ठरणार निर्णायक! 'या' राशींवर पैशांचा वर्षाव, तर काहींना होऊ शकतो आर्थिक फटका

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT