वेर्ण्यात भीषण दुर्घटना! धावत्या मिनी टेम्पोवर कोसळली उच्चदाब वीजवाहिनी; 30 वर्षीय क्लिनरचा जागीच मृत्यू

Verna Mini Tempo Accident Cleaner Death: वेर्णा परिसरात शनिवारी रात्री एक दुर्दैवी अपघात घडला. बिल्ला क्रॉसजवळून जात असलेल्या एका मिनी टेम्पोवर अचानक उच्चदाबाची वीजवाहिनी तुटून पडल्याने मोठी दुर्घटना घडली.
Verna Mini Tempo Accident Cleaner Death
Verna Mini Tempo Accident Cleaner DeathDainik Gomantak
Published on
Updated on

वेर्णा परिसरात शनिवारी रात्री एक दुर्दैवी अपघात घडला. बिल्ला क्रॉसजवळून जात असलेल्या एका मिनी टेम्पोवर अचानक उच्चदाबाची वीजवाहिनी तुटून पडल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत टेम्पोवरील 30 वर्षीय क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाने प्रसंगावधान राखत वाहनातून उडी मारल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला.

प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी मिनी टेम्पो नेहमीप्रमाणे मार्गावरून जात होता. त्याच वेळी वरून जाणारी वीजवाहिनी अचानक तुटून थेट वाहनावर कोसळली. चालकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तत्काळ वाहनाबाहेर उडी घेतली. मात्र, क्लिनरला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. जिवंत विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Verna Mini Tempo Accident Cleaner Death
Goa General Category Commission: 'आर्थिक मागासांसाठी स्वतंत्र आयोग स्थापना करा'! सुहास फळदेसाई, क्षत्रिय मराठा समाज संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

मृत व्यक्ती छत्तीसगडचा रहिवासी

मृत क्लिनर हा मूळचा छत्तीसगड राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. रोजगाराच्या निमित्ताने तो गोव्यात काम करत होता. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे सहकारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Verna Mini Tempo Accident Cleaner Death
Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून वीजवाहिनी तुटण्यामागील नेमके कारण, तसेच संबंधित यंत्रणेची जबाबदारी याबाबत पोलिस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com