electric shock Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: मायेच्या ओढीने 'तो' घरी आला, आईची विचारपूस करतानाच शॉक लागला; वेरेत युवकाचा मृत्यू

Goa News: आईची विचारपूस करत असताना रवीचा हात दाराशेजारी असलेल्या वीजेच्या तारेला लागला. वीजेच्या झटक्याने तो खाली कोसळला.

Pramod Yadav

म्हापसा: होंडा, सत्तरी येथे वीजेचा धक्का लागून लाईनमन मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आंबेखंड वेरे येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. आईला भेटण्यासाठी आलेल्या युवकाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. गुरुवारी (२२ मे) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

रवी बिरादर (३६, रा. सुकूर पर्वरी) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. रवी गुरुवारी सायंकाळी वृद्ध आईला भेटण्यासाठी आंबेखंड वेरे येथे आला होता. आईची विचारपूस करत असताना रवीचा हात दाराशेजारी असलेल्या वीजेच्या तारेला लागला. वीजेच्या झटक्याने तो खाली कोसळला.

मुलगा रवी खाली कोसळताच आईने आरडोओरडा करण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत रवीला गोमेकॉत दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रवीची वृद्ध आई एकटीच घरी राहते, त्यामुळे तो वरचेवर आईला भेटायला यायचा असे स्थानिकांनी सांगितले.

सत्तरीत वीजेचा धक्का लागून लाईनमनचा मृत्यू

होंडा, सत्तरीत वीजेचा धक्का लागून लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना २० मे रोजी घडली. चंद्रू गांवकर (मोर्ले, सत्तरी) असे या वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या लाईनमनचे नाव आहे. यात सर्वेश गांवकर हा कर्मचारी जखमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT