Goa Drowning Death Dainik Gomantak
गोवा

Goa Drowning Death: पालकांच्या निष्‍काळजीपणामुळे 2 बालिकांचा बुडून अंत; शिरवई व आगोंद येथील घटना, 24 तासांत 3 बळी

Girl Drowning Death Incident: पाडामळ-शिरवई व इगर्जीवाडा-आगोंद येथे दोन वेगवेगळ्‍या घटनांत दोन बालिकांचा बुडून अंत झाल्‍याने राज्‍यभर हळहळ व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे/आगोंद : बागा येथे काल रविवारी संध्‍याकाळी एका ६ वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्‍यू झाल्‍याची घटना ताजी असतानाच पाडामळ-शिरवई व इगर्जीवाडा-आगोंद येथे दोन वेगवेगळ्‍या घटनांत दोन बालिकांचा बुडून अंत झाल्‍याने राज्‍यभर हळहळ व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

पहिल्‍या घटनेत पाडामळ-शिरवई येथे मामाच्या घरी लग्नसमारंभासाठी आलेल्‍या ९ वर्षीय सेहर शेख या बालिकेचा कालव्यात पडून मृत्यू होण्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना काल रविवारी संध्याकाळी पाचच्‍या सुमारास घडली. सेहर बेपत्ता असल्याचे काही वेळाने कुटुंबीयांच्‍या लक्षात येताच तिची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.

पण ती न सापडल्याने अखेर रात्री दहाच्‍या सुमारास केपे पोलिसांत तक्रार देण्यासाठी धाव घेतली असता सेहरचा मृतदेह पॉप जॉन विद्यालयाजवळ असलेल्या कालव्यात तरंगात आढळून आला. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह पाण्‍याबाहेर काढून इस्‍पितळात पाठवून दिला. घटनेचा पंचनामा करण्‍यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

केपे भागातील शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. पण आता या कालव्यांत पडून जीवितहानी होऊ लागल्याने सुरक्षेचा प्रश्‍‍न ऐरणीवर आला आहे. दरम्‍यान, काही महिन्‍यांपूर्वी शिवनगर-शेल्डे येथे दोन चिमुकल्यांचा कालव्यात पडून मृत्यू झाला होता.

कालवे ठरताहेत लहान मुलांसाठी जीवघेणे

२४ एप्रिल : कुचेली-म्हापसा जलशुद्धीकरण प्रकल्‍पाजवळ तिळारी कालव्यात ओंकार प्रभुदेसाई (२६) याचा तर ताकार-दावकोण येथे दूधसागर नदीवर आंघोळीसाठी गेलेला अनिल बाळेगाळ (३२, रा. वास्‍को) याचा बुडून मृत्यू.

२७ एप्रिल : मुझफ्फरपूर (बिहार) येथील ५ वर्षांची मुलगी संध्या कुमारी हिचा हडफडे येथील हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू. हणजूण पोलिसांनी हॉटेलच्या व्यवस्थानाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.

२६ एप्रिल : उस्ते-सत्तरी येथील नदी पात्रात कुंकळ्ळी येथील राजेश सिंग (२४) याचा मृत्यू.

४ मे : बागा-कळंगुट येथे समुद्रात उत्तरप्रदेशमधील ६ वर्षीय झोया खान हिचा मृत्यू.

५ मे : आगोंद आणि शिरवई येथे दोन बालिकांचा अंत.

३ वर्षांची फातिमा खेळत गेली स्विमिंग पुलाजवळ

इगर्जीवाडा-आगोंद येथील एका शॅक्सच्या स्विमिंग पूलमध्ये पडल्‍याने फातिमा आल्फ्रोझ सैझी (३) या बालिकेचा मृत्‍यू झाला. ही घटना काल रविवारी दुपारी घडली. विशेष म्‍हणजे आई-वडील जवळच होते. खेळत खेळत ती स्विमिंग पुलाजवळ पोहोचली व आत पडली.

लग्नकार्याच्‍या गडबडीत सेहरकडे दुर्लक्ष : केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल ४ रोजी सेहर शेख ही मुलगी आपल्या पालकांसह पाडामळ येथे लग्नसमारंभासाठी मामाच्या घरी आली होती. ‘संध्याकाळी आपल्याला खेळायला घेऊन जा’ असे तिने आपल्या आईला सांगितले होते.

पण लग्नकार्याचे काम असल्याने तिच्या आईने ‘नंतर जाऊया’ असे सांगितले. संध्‍याकाळी चारच्‍या सुमारास सेहर ही आपल्‍या कुटुंबीयांची नजर चुकवून घराशेजारी असलेल्या कालव्याजवळ गेली. तेथे काळ तिची वाट पाहतच होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT