Goa Traffic Police: Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: राजधानी पणजीत येताय? 'या' गोष्टीवर आवर्जून लक्ष द्या; नुकतीच 18 जणांवर झालीय कारवाई

दोनापावल सर्कल ते मिरामार या बायपास रस्ता तसेच अटल सेतू पुलावर विशेष मोहीम राबवण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Police: भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी आज दोनापावल सर्कल ते मिरामार या बायपास रस्ता तसेच अटल सेतू पुलावर विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेवेळी 18 वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही मोहीम पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे.

या मोहिमेवेळी वाहतूक पोलिस अधीक्षक अक्षत कौशल हे जातीने उपस्थित होते. पणजी शहरात वाहनांची संख्या वाढली असतानाही वेगमर्यादेचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही धडक मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मिरामार ते दोनापावल या बायपास रस्त्यावर सकाळच्या प्रहरी वाहनांची मोठी वर्दळ नसल्याने वाहन चालक वेगमर्यादेचे उल्लंघन करून भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिस विभागाकडे आल्या होत्या.

सकाळच्यावेळी काही लोक मॉर्निंग वॉकसाठी जातात त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या वाहन चालकांचे नियंत्रण जाऊन पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना धोका संभवू शकतो. स्पिड रडारवर नोंद झालेली वेगमर्यादा मर्यादेपेक्षा अधिक असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही मोहीम या रस्त्यावर अधूनमधून सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पर्वरीच्या बाजूने अटल सेतूवर दुचाकींना बंदी असल्याचा फलक असूनही अनेक पर्यटक दुचाकीने या पुलावर येतात. त्यांना मेरशीच्या बाजूने अडविले जाते.

पुलाच्या आकर्षणाने आलेल्या पर्यटकांना अडवून त्यांच्याकडून नो एन्ट्रीप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाते. या पुलावर 40 किलोमीटर वेगमर्यादा असतानाही 80 ते 100 किलोमीटर वेगाने वाहन चालक पुलावरून येतात.

कठोर कारवाईची गरज

पुलावर ठिकठिकाणी वेगमर्यादेचे फलक लावलेले आहेत, तरी त्याचे उल्लंघन केले जात आहे. वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून ठोस कडक कारवाई करण्याबाबतही विचार सुरू आहे.

अनेकदा भरवेगामुळे वाहनांवरील नियंत्रण जाऊन वाहने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन अपघाताच्या घटना राज्यात घडत आहेत. त्यामुळे कठोर कारवाईची गरज आहे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT