Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: काळ्या काचांवर कारवाईचा धडाका; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Traffic Police: वर्षभरात 8.30 लाख दंड वसुली

Ganeshprasad Gogate

Goa Traffic Police: चारचाकी वाहनाला खासकरून कार, जीपला काळी काच लावण्यास कायद्याने बंदी आहे तरीही वाहनचालकांकडून त्याचे उल्लंघन करून काळी काच लावली जाते. वाहने खरेदी केल्यानंतर काचांना फिल्मिंग केले जाते.

अशा पोलिसांकडून मोटार वाहनांवर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. गेल्या वर्षभरात पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून 8 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अनेकजण व्हीआयपी असल्याचे भासवण्यासाठी काचांना फिल्मिंग करत असतात. गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींकडूनही अशा वाहनांचा सर्रास वापरही केला जातो. मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारच्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.

काळ्या काचा किंवा फिल्मिंग काढून टाकण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. यापूर्वी विधानसभेच्या - अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला होता.

कारवाई सुरूच राहील-

मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहनांचे फिल्मिंग करण्यावर बंदी असूनही उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

680 वाहनांवर कारवाई-

वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जानेवारी 2013 ते डिसेंबर 2023 पर्यंत 680 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

त्यांच्याकडून 8 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असा आहे दंड... मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पहिल्यांदा 500 रुपये, दुसऱ्यांदा दीड हजार रुपयांचा दंड आकारला जातो.

11 हजार वसूल यावर्षी जानेवारी महिन्यात वाहतूक पोलिसांनी 16 वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 11 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलिसांकडून केलेल्या कारवाईत स्थानिकांसोबत बऱ्याच पर्यटकांचाही समावेश आहे. केलेल्या कारवाईचे प्रमाण महामार्ग, किनारी भागात जाणाऱ्या रस्त्यावर जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT