Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: धोकादायक वाहने हाकणाऱ्यांना नोटीस; परवानाही रद्द होणार

Goa Traffic Police: अहवालानंतरच दंडात्मक कारवाई

Ganeshprasad Gogate

Goa Traffic Police: राज्यात वाढणाऱ्या रस्ता अपघातांची तसेच चालकांकडून होणाऱ्या नियम उल्लंघनाची गंभीर दखल घेत वाहतूक खात्याने कठोर कारवाई करण्याचे ठरविले आहे. वाहन चालकांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या तसेच धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या 20 मालकांना वाहतूक खात्याने कारणेदाखवा नोटीस बजावून त्यांचे वाहन परवाना का रद्द करू नये? यावर उत्तर मागवले आहे.

मद्यप्राशनप्रकरणी दंडात्मक कारवाई झालेल्यांचे चालक परवाने तसेच वाहन परवाने निलंबित करण्यास वाहतूक खात्याला शिफारस केली जाते.

निष्काळजीपणे वाहन चालविल्याने अपघातास कारणीभूत ठरलेल्या तसेच धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करून त्यांचे वाहन परवाना व चालक परवाने निलंबित करण्यात येतात मात्र कडक कारवाई करूनही रस्ता अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही.

गेल्या आठवड्यात जुन्या मांडवी पुलावर कार चालकाने वेगमर्यादेचे पालन न केल्याने तसेच ओव्हरटेक केल्याने एका निष्पाप दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दाबोळी येथे ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

बार्से येथे ओव्हरटेक करताना कारची धडक बसून दुचाकीस्वार महिला ठार झाली होती. वाहतूक नियमांचे पालन न करता तसेच भरधाववेगाने वाहने चालविल्याने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शिफारस केली जाते.

रस्ता अपघातातील वाहनांव्यतिरिक्त मद्यप्राशन करून वाहन हाकणे, वेगमर्यादेचे पालन न करणे, मोबाईलवर बोलणे, वाहतूक सिग्नल तोडणे तसेच मालवाहतूक वाहनात प्रवाशांना बसवणे, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे अशा प्रकरणात दंडात्मक कारवाई झालेल्यांचा अपघाताचा अहवाल वाहतूक खात्याला पाठविला जातो.

त्याच्यानुसार वाहतूक खात्यांकडून वाहन मालकांना कारणेदाखवा नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यांना बाजू मांडण्याची संधी देऊन समाधानकारक उत्तर नसल्यास कारवाई केली जाते असे वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले.

492 भीषण अपघात!

हल्लीच पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार गेल्या तीन वर्षात 492 दुचाकीचे गंभीर भीषण अपघात झाले होते त्यामध्ये 257 जणांनी हेल्मेट घातलेले होते तर 246 जणांनी हेल्मेट घातले नव्हते. 2021मध्ये 137, 2022 मध्ये 168 तर 2023 मध्ये 187 दुचाकीचे गंभीर अपघात झाले होते.

रेंट ए बाईक/कारचे 2021 मध्ये 45, 2022 मध्ये 38 तर 2023 मध्ये 52 अपघात घडले होते. मद्यप्राशन, निष्काळजीपणा, भरधाववेग, रस्त्यांबाबत व वाहतूक सिग्नलसंदर्भात पुरेसे नसलेली माहिती ही अपघाताची कारणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT