Goa Traffic Challan Rule Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Challan Rule: दिवसा PI, रात्री PSI ला चलन देण्याचा अधिकार; इतर कोणी दिल्यास होणार निलंबन, CM सावंतांचा मोठा निर्णय

CM Pramod Sawant Traffic Rules: वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी वाहतूक पोलिसांना चलन (Traffic Challan) देण्याच्या अधिकारात मोठा बदल करण्यात आला आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा सरकारनं राज्यातील पोलिस यंत्रणेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी वाहतूक पोलिसांना चलन (Traffic Challan) देण्याच्या अधिकारात मोठा बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (४ एप्रिल) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या नियमाबाबत माहिती दिली.

नव्या नियमानुसार, दिवसाच्या वेळेत (सकाळपासून सायंकाळपर्यंत) केवळ बॉडी कॅमेरा असलेल्या पोलीस निरीक्षकांनाच चलन देण्याचा अधिकार असेल, तर रात्रीच्या वेळी देखील बॉडी कॅमेरा असलेल्या पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांनाच हा अधिकार असेल. अन्य कोणत्याही पदावरील पोलिस अधिकाऱ्याला चलन देण्याचा अधिकार राहणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

...तर निलंबनाची कारवाई होणार

जर इतर पोलिस अधिकारी नियमांचे उल्लंघन करून चलन देण्याचा प्रयत्न करत असतील, तर संबंधित नागरिकांनी त्याचा फोटो घेऊन संबंधित पोलीस स्थानकाला पाठवावा. असे करणाऱ्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल आणि त्याला निलंबित करण्यात येईल, असं देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केलं.

बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा

हा निर्णय आजपासून (४ एप्रिल २०२५) अमलात आणला जात असून, राज्यभरातील पोलिसांनी नव्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत.

बैठकीत नवीन कायद्यांची अंमलबजावणी, फॉरेन्सिक व्हॅन अधिक सक्षम करणे, पोलिसांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा वाढवणे, फॉरेन्सिक तपास विभागात भरती, ई-एफआयआर, पोलिस प्रशिक्षणावर भर यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT