Panjim | CCTV Camera Daink Gomantak
गोवा

Panjim: पणजी अन् पर्वरीत आणखी CCTV कॅमेरे बसवणार; कायदा न पाळणाऱ्यांवर कारवाई

Panjim: पणजी स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Panjim: पणजी आणि पर्वरी येथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर नवीन वर्षात आणखी कॅमेरे दोन्ही ठिकाणी बसवले जातील, अशी माहिती वाहतूक खात्याने दिली आहे.

कॅमेरा प्रणालीद्वारे मनुष्यबळाचा वापर न करता वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वाहतूक नोंद असलेल्या व्यक्तीला त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर चलन पाठवले जाईल, तसेच नोंदणीकृत मोबोईल क्रमांकावर एसएमएससुद्धा पाठवला जाणार आहे.

नेहमी होणाऱ्या उल्लंघनामध्ये अतिवेगाने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेटविना दुचाकी चालवणे, सिटबेल्‍टविना वाहन चालवणारे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे यांचा समावेश आहे. सध्या पणजी, दोनापावला, रायबंदर - चिंबल, पर्वरीतील ओ कोकेरो सर्कल येथे पणजी स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

कॅमेऱ्यात कैद झालेल्या प्रकारांची माहिती आज्ञा आणि नियंत्रण कक्षातून आली आहे. त्यामुळे उल्लंघन करणाऱ्यांना चलन देणे सोपे झाले आहे. लवकरच ही प्रकिया सुरू होणार आहे. अंमलबाजवणीपूर्वी सार्वजनिक नोटीस जाहीर करून माहिती दिली जाणार आहे, असे राजन सातार्डेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: दिवाळीतही पाऊस! नरकासूरही भिजले; 2 दिवस यलो अलर्ट जारी

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिस यंत्रणा दबावाखाली

..त्यावेळी दिवाळीला कडाक्याची थंडी पडायची, पहाटे उठून हांड्याखाली जाळ घालायचा, पणत्या पेटवायच्या; समाधान देणारा सण

Goa Crime: 'तुम्ही गुन्हा केला आहे', ट्रिपल सीट फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांना धमकावले; उकळले पैसे; दुर्भाट परिसरात खळबळ

Shipyard Blast: 'नुकसान भरपाई द्या, मगच मृतदेह ताब्यात घेऊ'; शिपयार्ड स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश, Video

SCROLL FOR NEXT