Minister Vishwajit Rane takes action Against employee  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: सर्टिफिकेटसाठी पैसे मागणारा 'नगर नियोजन'चा कर्मचारी निलंबित; मंत्री विश्वजीत राणेंची कारवाई

नागरिकांच्या तक्रारींची दखल, प्रमाणपत्रासाठी सतत अडवणूक केल्याचा आरोप

Akshay Nirmale

Vishwajit Rane: नगर व शहर नियोजन खात्यातील ग्रेड वन ड्राफ्ट्समन चंद्रशेखर तुयेकर विविध प्रकारची प्रमाणपत्रे देण्यास लोकांकडून खंडणी व सतावणूक करत असल्याच्या आरोपाखाली सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. नगरनियोजन मंत्री विश्‍वजित राणे यांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान, मुख्य नगर नियोजक जेम्स मॅथ्यू यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली आहे. या चौकशीत तुयेकवरवरील आरोप सिद्ध झाले तर त्याला तत्काळ सेवेतून बडतर्फ केले जाईल, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले आहे.

तुयेकर हा लोकांना प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी करत होता. सततच्या अडवणुकीमुळे त्याच्याविरोधात अनेक तक्रारी खात्याकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विविध खात्यात कामचुकार तसेच भ्रष्ट कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT