गोवा: पर्यटकांच्या गैरवर्तनाचा वाढता प्रकार अधोरेखित करणारी एक धक्कादायक घटना गोव्यात समोर आली आहे. २९ मेच्या दिवशी दोन दारुड्या अल्पवयीन पर्यटकांनी एका स्थानिक रहिवाशाच्या पाळीव श्वानाला ओढत नेऊन गंमत म्हणून स्विमिंग पूलमध्ये फेकल्याचा आरोप आहे. या श्वानाला त्वचेची गंभीर ॲलर्जी होती, त्याला पूलमध्ये सोडल्यानंतर भरपूर त्रास झाला तर पर्यटक मात्र हसत-खेळत याचा व्हिडिओ काढत होते.
या धक्कादायक घटनेची माहिती श्वानाच्या मालकाने दिली. त्यांच्या मते, या कृत्याने केवळ श्वानाला शारीरिक इजा झाली नाही, तर तो भावनिकदृष्ट्याही खूप घाबरला आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काही पर्यटकांकडून दाखवला जाणारा अनादर आणि त्यांना मिळालेले फाजील स्वातंत्र्य यामुळे अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिक यापुढे अशा घटनांवर कठोर कारवाई करणे आणि सामाजिक जीवन व प्राणी कल्याणाबद्दल आदर राखण्याची मागणी करत आहेत. गोव्याची 'अतिथी देवो भव' या भावनेचा गैरवापर किंवा गैरवर्तन केल्यानंतर गोमंतकीय सहनशीलता दाखवतील असा गैरसमज करून घेऊ नये असेही ते ठामपणे सांगत आहेत. अशा घटनांमुळे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला धक्का लागत असून, पर्यटकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.