
Goa Trip Plan: सह्याद्रीच्या निसर्गराजीत वसलेला गोवा प्रत्येकाला भुरळ पाडतो. दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक मोठ्यासंख्येने गोव्याला भेट देतात. पर्यटन हंगामात पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. मनाला भावणारं गोव्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना साद घालतं. खासकरुन पावसाळ्यात गोव्याचं निसर्ग सौंदर्य अधिक खुलतं.
मुसळधार सरींचा शिडकाव गोव्याच्या निसर्ग सौंदर्याला चार चांद लावतो. सगळीकडे हिरवीगार वनराई, अथांग दर्या आणि हवेतील गारवा मंत्रमुग्ध करतो. एकदा तरी जीवाचा गोवा केला पाहिजे असं म्हटलं जात. तुम्हीही गोवा ट्रिप प्लॅन करत असाल खासकरुन पावसाळ्यात तर त्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...
गोव्यात स्वस्तात प्रवास करण्यासाठी स्कूटी भाड्याने घेणे हा उत्तम पर्याय आहे. लोकल बस सेवा देखील किफायतशीर आहे. शक्य असल्यास तुम्ही ग्रुपमध्ये प्रवास करावा, त्यामुळे प्रवास खर्च विभागता येतो.
भारतीय रुपया हेच गोव्यात वापरले जाणारे अधिकृत चलन आहे. इतर कोणतेही चलन आणण्याची गरज नाही. विदेशी नागरिकांनी इंडियन रुपीमध्ये चलन विनिमय करुनच व्यवहार करावा.
पहिलं: प्रवासाची तारीख आणि कालावधी ठरवा.
दुसरं: हॉटेल किंवा होमस्टे आधीच बुक करा.
तिसरं: स्कूटी/कार बुकिंग करा.
चौथं: प्लॅसेस टू व्हिजिट यादी तयार करा (समुद्रकिनारे, किल्ले इत्यादी...)
पाचवं: लोकल फूड आणि मार्केट्सचा देखील अनुभव घ्या.
उत्तर गोवा: पार्टी, लाईव्ह म्युझिकचा आनंद घ्यायचा असेल उत्तर गोवा तुमच्यासाठी बेस्ट आहे. येथील समुद्रकिनारे खासकरुन कळंगुट, बागा इत्यादी ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
दक्षिण गोवा: गोव्यात तुम्हाला शांतता, निसर्गरम्यता अनुभवयाची असेल तर दक्षिण गोवा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. खासकरुन येथील शांत समुद्रकिनारे मोहिनी घालतात.
तुमच्या पसंतीनुसार निवड करा.
* बजेट ट्रॅव्हलर: 1000-1500 ₹/दिवस
* मिड-बजेट: 2000-3000 ₹/दिवस
* लक्झरी: 5000+ ₹
यामध्ये तुमचे राहणे, जेवण, स्कूटी आणि एंट्री फीचा समावेश असतो.
होय, जूनमध्ये गोव्यात मॉन्सून सुरु होतो. पर्यटक कमी असल्यामुळे कमी गर्दी असते, पण पावसामुळे समुद्रकिनारी आणि धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र निसर्गप्रेमींसाठी ही उत्तम वेळ आहे.
गोवा तुमच्या ट्रॅव्हल स्टाईलनुसार महाग किंवा स्वस्त ठरु शकतो.
* स्थानिक जेवण, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरल्यास स्वस्त
* रिसॉर्ट, क्लब, खास डिनर केल्यास महाग
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.