Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

Goa Tiger Reserve: नेत्रावळी गावाला गेल्या पंचवीस वर्षांत मानवनिर्मित काही समस्‍यांना सातत्‍याने सामोरे जावे लागले आहे. या-ना-त्‍या कारणाने जाचक अटी लादला जाण्‍याचा धोका कायम राहिला.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: नेत्रावळी गावाला गेल्या पंचवीस वर्षांत मानवनिर्मित काही समस्‍यांना सातत्‍याने सामोरे जावे लागले आहे. या-ना-त्‍या कारणाने जाचक अटी लादला जाण्‍याचा धोका कायम राहिला. लोकांना वास्‍तवभान देणे आवश्‍‍यक आहे. या गावावर आणखी निर्बंध नकोत, अशी भावना राहिवाशांनी व्यक्त केली आहे.

१९९९ साली राष्ट्रपती राजवट असताना राज्यपाल जेकॉब यांनी नेत्रावळी अभयारण्याची घोषणा आणि अंमलबजावणी सुरू केली. त्या काळी प्रभाकर गावकर हे सांगेचे आमदार होते. नेत्रावळी गावात अभयारण्य विरोधात सभा घेऊन विषय लोकांना समजावून सांगण्यात आला.

त्यावेळी वन अधिकारी लोकांना त्रास होणार नाही, अमुक होणार नाही तमुक होणार नसल्याची ग्वाही देऊन गेले; पण त्यातील एकही गोष्ट खरी उतरली नसून उलट जाचक अटी अधिक तीव्र करण्यात आल्या, असे मत ग्रामस्‍थ व्‍यक्‍त करत आहेत.

Goa
Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

निर्बंध येतात, ग्रामस्‍थांचा दावा

परिसरात राखीव वन क्षेत्र घोषित करण्यात आले. लोकवस्तीला टेकून असलेले क्षेत्रात नाकाबंदी होऊ लागली. गुरा-ढोरांना फिरणे कठीण झाले. सर्वत्र खंदक खणण्यात आले. जंगलात फिरणेसुद्धा मुश्किल बनले.

गावाच्या वेशीला बफर झोनच्या सीमा रेखांकित करण्यात आल्या. बंद असलेल्या खाणी बफर झोनमध्ये समाविष्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डंप केलेला खनिज माल बफर झोनमध्ये पडून आहे.

Goa
Tiger Reserve Goa: समिती करणार व्याघ्र प्रकल्प क्षेत्र पाहणी, गुरूवारी सचिवालयात होणार संबंधित घटकांशी चर्चा

न पाहिलेल्या वाघासाठी नेत्रावळीची लोकवस्ती खाली करून जनतेला बेघर करण्यासारखा प्रकार सुरू आहे. व्‍याघ्र क्षेत्राला आपला विरोध आहे. नवनव्या झोनची मागणी करणारे शहरातील वातानुकुलीत खोलीत बसून ग्रामीण भागातील जनतेला सुखाने जगू देत नाहीत.

- सुभाष फळदेसाई, आमदार सांगे तथा मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com