Police Canva
गोवा

Drunk and Drive: सावधान! नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाताय? मद्यपी वाहनचालकांवर असणार बारीक नजर

Drunk Driving Action Goa: नववर्षाला दोन दिवस बाकी असले तरी देशी तसेच विदेशी पर्यटक गोव्यात दाखल व्हायला सुरवातही झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्यात आणखी भर पडणार आहे.

Sameer Panditrao

Strict action on drunk drivers in Goa

फातोर्डा: नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह इतर राज्यांतील पर्यटक आपली खासगी वाहने घेऊन गोव्यात ३१ डिसेंबरला नवे वर्ष साजरे करण्यासाठी येत असतात. गोव्यातील समुद्र किनारे हे त्यांचे खास आकर्षण आहे. त्यामुळे मध्यरात्री गोव्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून जात असतात.

मात्र, या पर्यटकांकडून दारूच्या नशेत वाहने हाकली जातात अशा वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्‍याचे संकेत कोलवा पोलिसांनी दिले असून अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती वाहतूक पोलिसांकडून मिळाली आहे.

नववर्षाला दोन दिवस बाकी असले तरी देशी तसेच विदेशी पर्यटक गोव्यात दाखल व्हायला सुरवातही झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्यात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे गोव्यातील वाहतुकीवर मोठा ताण येणार आहे. वाहने चालविणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यावर रस्ता अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा वाहतूक पोलिसांनी सर्वत्र जय्यत तयारी केली आहे. गोव्यातील मोक्याच्या ठिकाणी या पर्यटक वाहनचालकांची अल्कोमीटरने तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

३५० पोलिस ठेवणार देखरेख

वार्का, कोलवा, बाणावली, पाळोळेसह इतर ठिकाणी मिळून दक्षिण गोव्‍यात एकंदरीत ३०० ते ३५० च्या आसपास वाहतूक पोलिस रस्त्यावर देखरेख ठेवणार असून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवणार आहेत. हे पोलिस ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजल्‍यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस विभागाकडून प्राप्‍त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT