Goa Tourism: गोवा इज फुल्ल ऑन! हॉटेल्स 80 टक्‍के बुक; पर्यटकांची बागा, टिटोजला पसंती

Goa Tourism In December: गोव्‍यात येत्‍या दोन दिवसात ते वाढतील अशी अपेक्षा बाणावली येथील जलक्रीडा व्‍यावसायिक पेले फर्नांडिस यांनी व्‍यक्‍त केली.
Goa Tourism: गोवा इज फुल्ल ऑन! हॉटेल्स 80 टक्‍के बुक; पर्यटकांची बागा, टिटोजला पसंती
Tourist In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

शनिवार आणि रविवार हे यंदा न्‍यू इयर विकेण्‍डला जोडून आल्‍याने गोव्‍यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. गोव्‍यातील सर्वांत मोठे रेल्‍वे जंक्‍शन असलेल्‍या मडगावच्‍या कोकण रेल्‍वे जंक्‍शनवर पर्यटकांचे लोंढे गाडीतून उतरताना दिसू लागले आहेत. त्‍यामुळे रेल्‍वे स्‍थानकावर लोकांची गजबज वाढली आहे. मडगावला लागून असलेल्‍या कोलवा आणि बाणावली समुद्र किनाऱ्यावरही देशी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्‍यामानाने यावेळी गोव्‍यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्‍या मात्र बरीच कमी झाली आहे.

उद्या आणि परवा गोव्‍यात येण्‍यासाठी तिकिटांचे दर गगनाला भिडणार आहेत. ३० आणि ३१ डिसेंबर रोजीही हे दर चढेच रहाणार आहेत. यामुळेच बहुतेक पर्यटकांनी शुक्रवारीच गोव्‍यात येणे पसंत केल्‍याचे दिसते. गोव्‍यात आलेले बहुतेक पर्यटक हे उत्तर भारतीय असून गोव्‍यात नवीन वर्ष साजरे करूनच आम्‍ही परत जाऊ, असे त्‍यांनी सांगितले.

Goa Tourism: गोवा इज फुल्ल ऑन! हॉटेल्स 80 टक्‍के बुक; पर्यटकांची बागा, टिटोजला पसंती
Goa Vegetable Prices: 15 रुपयांना एक शेवग्याची शेंग, 100 ला जुडी; कांदा, बटाटा व टोमॅटो किती महाग? वाचा बाजारभाव

गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या कमी झाली, या प्रचारात फारसे तथ्‍य नाही. गोव्‍यात सध्‍या ८० टक्‍के हॉटेलातील खोल्‍या बुक झालेल्‍या आहेत. येत्‍या दोन दिवसात हे बुकिंग आणखीन वाढण्‍याची शक्‍यता आहे. असे असतानाही समाज माध्‍यमांवर काही इन्‍फ्‍लूएन्‍सर्स विनाकारण गोव्‍याची बदनामी करत आहेत. सकाळच्‍यावेळी गोव्‍यातील समुद्र किनारे शांत असतात. त्‍यावेळचेच फोटो आणि व्‍हिडिओ काढून ते समाज माध्‍यमांवर अपलोड करून ही बदनामी करण्‍याचे कारस्‍थान सुरू आहे.

- नंदन कुडचडकर, आदरातिथ्‍य क्षेत्रातील व्‍यावसायिक.

बागा, टीटोजची क्रेझ

यातील बहुतेक पर्यटकांचे पहिले पसंतीचे स्‍थान उत्तर गोव्‍यातील बागा आणि कळंगुट किनारा असून मडगावला उतरणाऱ्या बहुतेक पर्यटकांच्‍या तोंडात बागा आणि टिटोज हे दोन शद्ब ऐकू येत होते. तर काही जणांनी काणकोणमधील पाळोळे आणि आगोंद या दोन ठिकाणाला पसंती दिली होती. मडगावजवळ असलेल्‍या कोलवा आणि बाणावली या दोन समुद्र किनाऱ्यांवरही देशी पर्यटकांची गर्दी दिसत होती.

Goa Tourism: गोवा इज फुल्ल ऑन! हॉटेल्स 80 टक्‍के बुक; पर्यटकांची बागा, टिटोजला पसंती
Indian Muslim: मुस्लिमांचे काय चुकते, त्यांच्या धर्मात सगळे आलबेल आहे का? विशेष लेख

समुद्र सफारीचा आनंद

कळंगुट येथे झालेल्‍या बोट अपघाताचा धक्‍का पर्यटकांना बसलेला असला तरी कोलवा व बाणावली या दोन किनाऱ्यांवर देशी पर्यटक बोटीतून सैर करताना दिसत होते. कित्‍येक देशी पर्यटकांनी या समुद्र सफारीचा आनंद लुटला. असे जरी असले तरी मागच्‍या वर्षीच्‍या तुलनेत गोव्‍यात येणारे पर्यटक जरा कमीच आहेत.

गोव्‍यात येत्‍या दोन दिवसात ते वाढतील अशी अपेक्षा बाणावली येथील जलक्रीडा व्‍यावसायिक पेले फर्नांडिस यांनी व्‍यक्‍त केली. सध्‍या काही यू-ट्यूबर्स इन्‍फ्‍लूएन्‍सर्सनी समाज माध्‍यमांवर गोव्‍याची नकारार्थी प्रतिमा तयार करणे सुरू केले आहे त्‍यामुळे कदाचित ही संख्‍या कमी झाली असावी, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

- सुशांत कुंकळयेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com