Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यात पर्यटकांची संख्या घटली; गुदिन्हो, लोबोंच्या विधानानंतर पर्यटन मंत्री विधानसभेत म्हणाले, पर्यटनावर...

Goa Tourism: महागाई आणि वाढत्या प्रवास खर्चाचा फटका

Ganeshprasad Gogate

Goa Tourism: पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांचा नेहमीच राबता असल्याचे चित्र काही वर्षांपूर्वी दिसत होते.

मात्र साधारणतः 2020 नंतर पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून ख्रिसमस, 31 डिसेंबर आणि नंतरचे 2-3 दिवस सोडले तर त्यानंतर गोव्यात फारशी वर्दळ दिसली नाही.

गोव्याच्या शहरीभागासह ज्या ठिकाणी हटकून गर्दी दिसते अशा किनारी भागातही पर्यटकांची संख्या रोडावलेली दिसतेय.

बुधवारी विधानसभेत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी देखील गोव्याच्या पर्यटनात घट झाल्याचा पुनरुच्चार केला. कोरोना तसेच हमास- इस्राईल युद्धाचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर झालेला असल्याचे खंवटे म्हणाले.

तसेच याच विषयावर आमदार लोबो यांनीही काही कारणं विशद केली होती. विमान प्रवास महागला असून हॉटेलचे दर वाढल्यानेही पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली आहे.

या महत्वाच्या कारणांमुळेच गेल्या 2-3 वर्षात पर्यटक संख्या रोडावली असल्याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तर औद्योगिक मंत्री माविन गुदिन्हो यांनीही गोवा महाग होत सल्याचे सांगत पर्यटक संख्या घटत असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

मोपा विमानतळावरील ब्लू कॅप टॅक्सी काउंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना गुदिन्हो म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टिने गोवा महाग होत चालला आहे.

टॅक्सीचे दर वाढले, हॉटेल्सचे रुम भाडे महाग झाले, एअरलायन्सची तिकटं महाग झाली. सगळ्याच बाजूंनी गोवा महाग होत चालला आहे. अशा परिस्थित गोव्यात यायचं की नाही याचा पर्यटक विचार करीत असल्याचे विधान गुदिन्हो यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT