Goa Assembly: गोव्यातले मंत्री-आमदारच वापरताहेत टिंटेड काचा असलेल्या गाड्या! त्यांच्यावर कारवाई कधी? वेंझी व्हिएगस यांचा सवाल

सभागृहात मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले
MLA Slams government over mlas using Tinted Car
MLA Slams government over mlas using Tinted CarDainik Gomahtak
Published on
Updated on

MLA Slams government over mlas using Tinted Car

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अनेक मुद्द्यांनी विधानसभा चांगलीच तापली. यावेळी पर्ये आमदार डॉ. देविया राणे यांनी आपला मुद्दा मांडल्यानंतर इतर आमदारांनीही त्याला दुजोरा दिला.

राज्यात लहान शाळकरी मुलांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी देविया राणे यांनी सभागृहात केली.  

देविया राणे यांच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मागच्या महिन्यात घडलेली केरी येथील शाळेतील एका मुलीच्या अपहरणाची घटना सांगितली. केरीतील एका शाळेबाहेर 9 वर्षाच्या मुलीला चोकोलेट देण्याच्या बहाण्याने संशयिताने हाताला धरून खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने प्रसंगावधान राखून हात सोडवून घेतला आणि अपहरणाचा प्रयत्न फसला.

यानंतर शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे, अपहरण करणारा संशयित हा टिंटेड काचा असलेल्या काळ्या रंगाच्या कारमधून आला होता. टिंटेड गाड्या वापरण्यावर बंदी असूनही सरकारच्या नियमांना धाब्यावर बसवत अनेकजण अशा गाड्या वापरत आहेत. या घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

शाळांमध्ये पोलीस तैनात...

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले असून परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेच; मात्र यामध्ये पालकांची भूमिकाही तितकीच महत्वाची असल्याचे ते म्हणाले.  

आमदार-मंत्रीच वापरताहेत टिंटेड काचा असलेल्या गाड्या.. : वेंझी व्हिएगस

आमदार डॉ. देविया राणेंच्या मुद्द्यावरून वेंझी व्हिएगस यांनी टिंटेड गाड्यांचा विषय काढत आमदार, माजी आमदार आणि मंत्रीच अशा गाड्या वापरत असल्याचा दावा केला. अशा गाड्या प्रतिबंधित असूनही हे राजरोसपणे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

यावर, दिगंबर कामत यांनी अशा गाड्या आढळल्यास टिंटेड कोटींग ब्लेडने काढण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com