Damaged tourist car after bus collision in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यात तामिळनाडूच्या पर्यटकांच्या कारला बसची जोरदार धडक, गरोदर महिलेसह 5 जण जखमी; फरार बस चालकाला पोलिसांनी फार्मागुडीत पकडलं

Goa Accident News: गोव्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारी (21 मे) पुन्हा एकदा एका भीषण अपघाताची घटना समोर आली.

Manish Jadhav

मोले: गोव्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारी (21 मे) पुन्हा एकदा एका भीषण अपघाताची घटना समोर आली. मोले कासावली येथे सकाळी 10:20 च्या सुमारास हा अपघात घडला. गोवा पाहण्यासाठी तामिळनाडूहून आलेल्या पर्यटकांच्या कारला एका भरधाव टुरिस्ट बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पर्यटकांपैकी एका गरोदर महिलेसह पाच जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू येथील पर्यटकांचा एक गट गोवा पाहण्यासाठी आला होता. या गटामध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि लहान मुलांचा समावेश होता. याचदरम्यान मोले कासावली परिसरात पाठीमागून येणाऱ्या एका वेगवान टुरिस्ट बसने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, कारमधील तीन महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याने अपघाताचे गांभीर्य अधिक वाढले. या अपघातात गरोदर महिलेसह एकूण पाच जण जखमी झाले असून लहान मुले सुदैवाने सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची (Accident) माहिती मिळताच कुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. गरोदर महिलेवर विशेष वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. दरम्यान, कारला धडक दिल्यानंतर टुरिस्ट बसचा चालक थांबण्याऐवजी बससह घटनास्थळावरुन पसार झाला होता. मात्र, वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवत फार्मागुडी येथे या बसला अडवले. पोलिसांनी बस जप्त केली असून बसचालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली. गोव्यातील वाढत्या अपघातांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सन्मानावर विशेष भर

Margao Dengue Cases: मडगावात डेंग्यूचा फैलाव! दहा दिवसांत 71 रुग्ण, 27 रुग्णांवर इस्पितळात उपचार

SCROLL FOR NEXT