Tourist Assault Goa Dainik Gomantak
गोवा

Tourist Assault Goa: "गोव्यात पुन्हा कधीच जाणार नाही" शिवीगाळ करून केली मारहाण, पर्यटकानं शेअर केला धक्कादायक अनुभव

Goa Tourist: गोव्याला फिरायला गेलेल्या एका पर्यटकानं त्याच्यासोबत घडलेल्या अत्यंत धक्कादायक अनुभवाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे, मात्र अलीकडेच घडलेल्या एका प्रकारामुळे राज्यातील पर्यटन सुरक्षा प्रश्नचिन्हांच्या भोवऱ्यात सापडली आहे. गोवा पर्यटकांसाठी खरच सुरक्षित आहे का? असा सवाल या प्रकारामुळे उपस्थित होत आहे.

एका पर्यटकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गोव्यात घडलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. तसंच पोस्टमध्ये या पर्यटकानं गोव्यात पुन्हा कधीच जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

पर्यटकानं पोस्टमध्ये म्हटलंय की, "मी माझ्या मैत्रिणीसोबत गोव्याला फिरायला गेलो होतो. कडक उन्हाळा असल्यामुळं आम्ही स्कूटीऐवजी चारचाकी गाडी भाड्यानं घेतली. परतीच्या वेळी मी तिला विमानतळावर सोडलं आणि मडगाव स्थानकावरून माझी रेल्वे पकडण्यासाठी निघालो.

या दरम्यान, दुचाकीवर असलेल्या दोन स्थानिकांनी माझ्यावर त्यांच्या गाडीला धक्का दिल्याचा खोटा आरोप केला. मात्र, मी कोणत्याही प्रकारे त्यांच्या गाडीला धक्का दिला नव्हता.

यानंतर या दोन स्थानिकांनी मडगाव रेल्वे स्थानकापर्यंत माझा पाठलाग केला. माझी गाडी अडवली आणि खिडकीची काच फोडण्याची धमकी दिली. मी खिडकी उघडताच, त्यातील एकानं मला जोरात मुक्का मारला. मी बाहेरून आलो तेव्हा त्यांनी मला शिवीगाळ करत मारहाण केली, असं पर्यटकानं पोस्टमध्ये म्हटलंय.

पर्यटकाने पुढे सांगितले की, काही जागरूक स्थानिकांनी परिस्थिती ओळखून हस्तक्षेप केला आणि त्याची सुटका केली. मात्र, माझ्यासोबत घडलेली घटना अंत्यत भयानक होती. मी कधीच गोव्याला पुन्हा जाणार नाही, असं पर्यटकानं पोस्टमध्ये म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पोलीस असल्याचे भासवून पर्वरी महामार्गावर अडवली गाडी, 8 लाख लुटले; इराणी गँगमधील संशयिताला पुण्यातून अटक

Goa Murder Case: गाडी सापडली कणकवलीत, संशयितांकडून बेदम मारहाण; पीर्ण येथील खूनप्रकरणाचा वाचा घटनाक्रम..

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

Horoscope: अनपेक्षित घडामोडींसाठी तयार राहा, महत्वाच्या व्यक्तीशी भेट उपयोगी ठरेल; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT