Goa to Mumbai Cruise: गोव्यातील पर्यटकांवर महाराष्ट्राचे ‘जाळे’! गोवा-मुंबई क्रुझ सेवा दृष्टीपथात, 'द्वारके'पर्यंत समुद्र सफर

Maharashtra theme park: गोव्यातील पर्यटक महाराष्ट्रात यावेत यासाठी आता गोवा ते मुंबई दरम्यान महाराष्ट्र सरकार क्रुझ सेवा सुरू करणार आहे.
Cruise tourism goa
Cruise tourismCanva
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील पर्यटक महाराष्ट्रात यावेत यासाठी आता गोवा ते मुंबई दरम्यान महाराष्ट्र सरकार क्रुझ सेवा सुरू करणार आहे. महाराष्ट्र सरकारने नीती आयोगाच्या सहकार्याने नवी मुंबईत जागतिक दर्जाचे ‘थीम पार्क’ उभारण्याची योजना जाहीर केली आहे.

‘थीम पार्क’ला गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी ही क्रुझ सेवा असेल. द्वारका, मुंबई, गोवा अशी सफर ती क्रुझ बोट घडवणार आहे. हे ‘पार्क डिस्नेवर्ल्ड’च्या धर्तीवर असेल आणि २०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळ व्यापेल. यामध्ये मनोरंजन क्षेत्र, वॉटर पार्क, रिसॉर्ट्स आणि ॲनिमेशन स्टुडिओ असतील. हा प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे मुंबईच्या पर्यटन उत्पन्नात चार पटीने वाढ होऊ शकते.

Cruise tourism goa
Goa Tourism Growth: गोव्यात खरंच पर्यटक वाढले की स्थलांतरित झाले? 'मोपा'ला पसंती; प्रवाशांची संख्या वाढली

त्याआधी ही क्रुझ सेवा सुरू केली जाणार आहे. मालवणजवळ नौदलाने मोडीत काढलेली नौका बुडवून तिच्या सभोवताली आकाराला येणारी सागरी जीवसृष्टी पाहण्यासाठी पर्यटकांना पारदर्शक पाणबुडीने नेण्याचा प्रकल्प साकारला जात आहे. त्याचेही लक्ष्य गोव्यात येणारे विदेशी पर्यटक असतील अशी माहिती मिळाली आहे.‘थीम पार्क’सह सुरत ते गोवा आणि द्वारका दरम्यान नवीन क्रूझ सेवा सुरू केली जाणार आहे. ही सेवा आठवड्यातून एकदा बंद्रा-वर्ली सीलिंकवरून सुटेल आणि सुरतच्या हजीरा बंदरात थांबेल.

Cruise tourism goa
Goa Tourism: गोवा पर्यटनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा, 'उत्कृष्ट एमआयटीटी कमबॅक' पुरस्कार प्रदान

सुरत-गोवा-द्वारका क्रूझ सेवेचाही पर्याय

गेल्या काही वर्षांत मुंबईत क्रूझ जहाजांद्वारे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अधिक चांगली पायाभूत सुविधा आणि नव्या क्रूझ पर्यायांमुळे हे क्षेत्र आणखी विस्तारेल. नवीन सुरत-गोवा-द्वारका क्रूझ सेवा भारताच्या वाढत्या क्रूझ पर्यटनाच्या संधींमध्ये भर घालेल आणि समुद्रप्रवास प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय ठरेल असे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com