Illegal Tourism Busines Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Tourism Busines Goa: राज्यातील बेकायदा पर्यटन व्यवसायांचे धाबे दणाणले! उपसंचालकांना मिळाले कारवाईचे 'फ्री हँड' अधिकार; दोन्ही जिल्ह्यात 'क्लीन-अप' मोहीम

Tourism Department Goa Update: ‘गोवा पर्यटक व्‍यापार नोंदणी कायद्या’चे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार पर्यटन खात्‍याने उत्तर आणि दक्षिण गोव्‍याच्‍या उपसंचालकांना दिलेले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: ‘गोवा पर्यटक व्‍यापार नोंदणी कायद्या’चे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार पर्यटन खात्‍याने उत्तर आणि दक्षिण गोव्‍याच्‍या उपसंचालकांना दिलेले आहेत. त्‍यामुळे दोन्‍ही उपसंचालक कायद्याचे उल्लंघन करून पर्यटन व्‍यवसाय थाटणाऱ्यांवर कारवाई करू शकतात. संचालक केदार नाईक यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

पर्यटन क्षेत्रातील नियम अधिक कडक करण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रशासकीय बदलाअंतर्गत पर्यटन विभागाने उत्तर आणि दक्षिण गोव्‍याच्‍या पर्यटन उपसंचालकांना ‘पर्यटक व्यापार नोंदणी कायद्या’अंतर्गत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. ते त्‍यामुळे कायद्याचे उल्लंघन करून व्‍यवसाय थाटणाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावू शकतात, अशा प्रकरणांत सुनावणी घेऊ शकतात, संबंधितांवर दंडात्‍मक कारवाई करू शकतात. तसेच कायद्याचे उल्लंघन झाल्‍याचे सिद्ध झाल्‍यास संबंधित आस्‍थापनांची नोंदणी रद्द करण्याचाही निर्णय घेऊ शकतात, असे आदेशात म्‍हटले आहे.

पथकांवरही ठेवणार देखरेख

संबंधित उपसंचालक आपापल्या कार्यक्षेत्रात संपूर्ण प्रभारी असतील. ट्रॅव्हल एजन्सी, शॅक्स आणि जलक्रीडा यांसारख्या पर्यटन उपक्रमांच्या अर्जांची छाननी, कागदपत्रांची पडताळणी आणि तपासणीचे पर्यवेक्षण करण्‍याचा अधिकार त्‍यांना असेल. तसेच नियमांचे पालन करण्यासाठी आणि पर्यटनस्थळांवर सुव्यवस्था राखण्यासाठी नेमण्‍यात येणाऱ्या पथकांवर देखरेख ठेवण्‍याचा अधिकारही त्‍यांना असेल, असेही आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT