Goa Tourism 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism 2023: गोव्यात येताय? ही बातमी वाचा; सरकारने पर्यटकांना केलीय 'ही' सक्ती, हॉटेल्सनाही दिल्यात सक्त सूचना

Goa Tourism 2023: पर्यटकांकडून माहिती घेण्याची सक्ती : पर्यटन खात्याची हॉटेलना सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism 2023: राज्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना आता गोव्याला भेट देण्याचा हेतू सांगण्याची सक्ती गोवा सरकारने केली आहे.

पर्यटकांनी हॉटेलमालकांना ही माहिती विहीत नमुन्यात भरून सादर करणे सक्तीचे केले आहे. यापूर्वी केवळ विदेशी पर्यटकांची माहिती देणे हॉटेल व गेस्ट हाऊस चालकांसाठी सक्तीचे होते.

मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्‍घाटन मार्चमध्ये झाल्यानंतर देशातील छोटी-मोठी शहरे हवाई मार्गाने गोव्याला जोडली गेली आहेत. गोव्यातून देशात किमान ७० ठिकाणी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे पर्यटकांची संख्या सध्या वाढली आहे. यामुळे गोव्यात पर्यटक का येतात, याची माहिती संकलीत करणे पर्यटन खात्याने सुरू केले आहे. हॉटेल व गेस्ट हाऊस चालकांनी पर्यटकांची माहिती खात्याला पुरवण्याची सक्ती करणारा आदेश पर्यटन संचालक सुनील अंचीपखा यांनी जारी केला आहे.

...ही माहिती आवश्‍यक

या आदेशानुसार पर्यटकाचे पूर्ण नाव, लिंग, वय, पूर्ण पत्ता, किती पर्यटक आले, किती खोल्या घेतल्या, त्यासाठी किती दर आकारण्यात आला, किती तारखेला आले आणि किती तारखेला निघाले, त्यांना गोवा भेटीची प्रेरणा कुठून मिळाली, याची माहिती देणे आता बंधनकारक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT