Tourist In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट; महसुलावर विपरित परिणाम

कोविडनंतर संख्येत घट : पर्यटनमंत्र्यांचे विधानसभेत लेखी उत्तर

गोमन्तक डिजिटल टीम

Foreign Tourists Visiting Goa राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर सरकार पर्यटन क्षेत्रातून मिळणाऱ्या महसुलावर लक्ष केंद्रीत करत आहे. गोवा हे जगाच्या नकाशावरील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने विदेशी पर्यटक येतात.

मात्र, कोविडनंतर गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती दिली.

या उत्तरात २०१९ ते २०२२ या कालावधीत राज्यात आलेल्या विदेशी पर्यटकांची आकडेवारी दिली आहे. रशिया, इंग्लंड, युक्रेन, पोर्तुगाल, कझाकिस्तान आणि अमेरिका या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

रशिया आणि इंग्लंडमधून २०१९ च्या पर्यटन हंगामात लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले होते. मात्र, चार वर्षांच्या कालावधीनंतर ही संख्या हजारांत पोहचली. युक्रेन, पोर्तुगाल, कझाकिस्तान आणि अमेरिकेतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

राज्याचा महसूल हा खाण व्यवसाय तसेच पर्यटनावर पूर्ण अवलंबून होता. खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर त्याची भिस्त पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलावरच होती. मात्र, कोविडनंतर परदेशी पर्यटकांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.

रशिया व इंग्लंडमधील पर्यटकांची संख्या कमी झाल्याने राज्याला मोठा फटका बसला आहे. चार्टर विमाने येत असली तरी त्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असल्याने त्याचाही परिणाम झाला आहे.

विदेशात ‘रोड शो’चे आकर्षण

पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळावा, अशी अपेक्षा आहे. यासाठी दर्जेदार व चांगले पर्यटक जे पैसे खर्च करतात, ते गोव्यात येणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्यात आवश्‍यक त्या साधनसुविधा उभारून विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी पर्यटन खात्याचे अधिकारी परदेशात रोड शोद्वारे गोव्यातील पर्यटनाचा प्रसार करत आहेत.

पर्यटनाला उतरती कळा

२०१९ साली ९,३७,११३ विदेशी पर्यटक गोव्यात आले होते. २०२० मध्ये त्यात घट होऊन हा आकडा ३,००,१९३ इतका झाला. २०२१ मध्ये तर केवळ २२,१२८ पर्यटक गोव्यात दाखल झाले. त्यानंतर २०२२ मध्ये कोणतेही निर्बंध नसल्याने १,६९,००५ विदेशी पर्यटक गोव्यात आल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT