Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याच्या ‘पर्यटन’ला डिजिटल प्रचाराचे पाठबळ; ‘अगोडा’शी सामंजस्य करार

Goa Tourism: नव्या सामंजस्य करारानुसार, ‘अगोडा’ गोव्याच्या विविध पर्यटन स्थळांचे आकर्षण आणि ऑफर्स यांची माहिती ‘अगोडा’ आपल्या डिजीटल माध्यमातून आपल्या जगभरातील प्रवाशांना देणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

जगभरातील प्रवाशांना गोव्यातील अविस्मरणीय सहलीचा अनुभव देण्यासाठी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘अगोडा’ने गोवा पर्यटन विभागासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

विशेषत: आशियाई बाजारपेठेतील प्रवाशांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन गोव्याने देऊ केलेल्या अनुभवांच्या समृद्ध पटलावर प्रकाश टाकणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे.

नव्या सामंजस्य करारानुसार, ‘अगोडा’ गोव्याच्या विविध पर्यटन स्थळांचे आकर्षण आणि ऑफर्स यांची माहिती ‘अगोडा’ आपल्या डिजीटल माध्यमातून आपल्या जगभरातील प्रवाशांना देणार आहे.

या भागीदारीद्वारे, डिजीटल प्रचार मोहिमा राबवून प्रवाशांचे अनुभव समृद्ध करण्यासाठी डिजिटायझेशनचे बळ वापरण्याकरता गोवा पर्यटन विभागासोबत काम करण्यासाठी ‘अगोडा’ वचनबद्ध आहे.

‘अगोडा’चे मुख्य व्यावसायिक अधिकारी डॅमियन फिर्श यांनी सांगितले की, ‘गोवा टुरिझम’शी हातमिळवणी करणे हे गोव्याच्या अनोख्या ऑफरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या तांत्रिक कौशल्याचा आणि अंतर्दृष्टीचा लाभ घेण्याची एक रोमांचक संधी सादर करते.

धोरणात्मक प्रयत्न आणि डिजिटल सुधारणांद्वारे, आम्ही गोव्याचे मनमोहक आकर्षण शोधण्यासाठी प्रवाशांना प्रेरित करण्याच्या आमच्या क्षमतेवर विश्वास आहे.

‘अगोडा’शी ही भागीदारी गोवा पर्यटन विभागासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे, पर्यटन क्षेत्रातील डिजिटल प्रगती आत्मसात करण्याच्या आमच्या समर्पणाला ही भागिदारी अधोरेखित करते. गोव्याचे सौंदर्य डिजिटलायझेशनद्वारे जगभरातील प्रेक्षकांना दाखवता येणार आहे, असे ‘जीटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपका म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

SCROLL FOR NEXT