Taxi Meter X
गोवा

Goa Taxi Meter: गोवा टॅक्सी सेवेबाबत महत्वाची बातमी! भाडे मीटर म्हणून 'ॲप'ला मान्यता; नियमांमध्ये सुधारणा

App-based taxi services in Goa: राज्य सरकारने २० हजारपैकी १८ हजार टॅक्सींना डिजिटल मीटर बसविल्यानंतर भाडे मीटर म्हणून ॲपलाच मान्यता दिली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa taxi regulations

पणजी:राज्य सरकारने २० हजारपैकी १८ हजार टॅक्सींना डिजिटल मीटर बसविल्यानंतर भाडे मीटर म्हणून ॲपलाच मान्यता दिली आहे. जानेवारीत नियमांत सुधारणा करण्यासाठी त्याचा मसुदा जारी करून जनतेकडून सूचना व हरकती मागवल्या होत्या.

राज्य सरकारने गोवा मोटर वाहन नियमांमध्ये सुधारणा अधिसूचित केली असून, ॲप-आधारित टॅक्सी अ‍ॅग्रीगेटरसाठी भाडे मीटर म्हणून ॲपलाच मान्यता देण्यात आली आहे, जर ते एसएमएस/ई-मेलद्वारे इनव्हॉइस प्रदान करत असेल. यासंदर्भात सरकारने जानेवारी २०२५ मध्ये मसुदा सुधारणा जारी करून जनतेकडून सूचना आणि अभिप्राय मागवले होते.

"जर मोटरकॅब ॲप-आधारित अ‍ॅग्रीगेटर अंतर्गत कार्यरत असेल, तर या नियमाच्या उद्देशाने ॲपला भाडे मीटर म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. तसेच, जर ॲपमध्ये एसएमएस/ई-मेलद्वारे इनव्हॉइस देण्याची सुविधा असेल, तर प्रिंटर बंधनकारक असण्याची आवश्यकता नाही, असे आज जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

अंदाजानुसार, गोव्यात नोंदणीकृत असलेल्या सुमारे २० हजार टॅक्सींपैकी १८ हजारहून अधिक टॅक्सींमध्ये आधीच मीटर बसवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT