पणजी: राज्यात पर्यटन हंगामाला यंदा अपेक्षित गती मिळाली नाही आणि याचे परिणाम आता थेट किनारपट्टीवरील शॅक्सच्या अकाली बंदीच्या रूपात दिसत आहेत. कोलवा, बाणावली वाडी समुद्र, कळंगुट, माजोर्डा, कांदोळी यांसारख्या लोकप्रिय किनाऱ्यांवर मार्चच्या उत्तरार्धापासूनच शॅक बंद होऊ लागले आहेत.
शॅक्स ३१ मेपर्यंत सुरू असतात. मात्र यंदा अनेक शॅक मालकांनी एप्रिलच्या सुरुवातीलाच पडदा टाकला. शॅक मालक कल्याण सोसायटी अध्यक्ष क्रूझ कार्दोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा हंगाम अवघ्या दीड-दोन महिन्यांतच संपल्यासारखा वाटतो. पर्यटकच नाहीत, मग शॅक चालवून काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे ते म्हणाले.
क्रूझ कार्दोझ म्हणाले की, एप्रिलपासून राज्यात देशी पर्यटक जास्त येतात आणि त्यांचीच वर्दळ असते परंतु यावर्षी ती कमी झाली आहे. याला वेगवेगळी करणे असली तरी राज्यात येण्यासाठी विमानांची तिकीट वाढल्याने याचा परिणाम अधिकच झाला आहे. याच तिकीट दारात मलेशिया आणि आशियामध्ये जाणे परवडते.
यंदाच्या हंगामात घडलेले हिंसक प्रकार, विशेषतः बीच परिसरात झालेले दोन खून, तसेच पर्यटक आणि शॅक कर्मचाऱ्यांतील वाद यामुळे गोव्याच्या प्रतिमेला धक्का बसवला आहे. सोशल मीडियावर या घटनांचा मोठा गाजावाजा झाल्यामुळे गोवा सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून मागे पडत आहे. तसेच, अधिकृत परवान्यांशिवाय शॅकचे विस्तार किंवा बाहेरील लोकांना सब-लीज देण्याचे प्रकारही वाढले आहेत, जे नियमनात अडथळा ठरत आहेत आणि स्थानिक व्यवसायांच्या अस्मितेलाही धक्का पोहोचवत आहेत.
कळंगुटमधील सांतवाडो, बागा, कोलवा मुख्य भाग, बाणवली तसेच इतर काही प्रमुख किनाऱ्यांवर अजूनही थोड्याफार प्रमाणात पर्यटक येत आहेत. या भागातील काही शॅक मालकांनी हंगाम पुढे वाढवण्याची मागणी केली आहे. स्थानिक आणि देशांतर्गत पर्यटकांचा ओघ सुटसुटीत दिसत असल्याने ही मागणी करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.