Goa Tourism: गोव्याच्या किनाऱ्यांवर शुकशुकाट, समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक पर्यटन हंगाम संपायच्या आधीच बंद

Goa Beach Shacks Closing Early: गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. मात्र पर्यटनप्रेमी गोव्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक लवकर बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.
Goa Beach Shacks Closing Early
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. मात्र पर्यटनप्रेमी गोव्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक लवकर बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. कोलवा, केळशी, कळंगुट, कांदोळी, मोरजी, बाणावली आणि माजोर्डा येथे मोठ्या संख्येने असलेले शॅक 31 मे रोजी संपणाऱ्या पर्यटन हंगामापूर्वीच बंद झाले.

गोवा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. यंदा मात्र पर्यटकांच्या खप्पा मर्जीला गोव्याला सामोरे जावे लागले. पर्यटकांना रिझवणारे इथले समुद्रकिनारे किनारे ओस पडू लागले आहेत.

शॅक बंदची नामुष्की

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मे महिन्याच्या अखेरीस वैध परवान्यांसाठी पैसे भरलेल्या बऱ्याच शॅक मालकांवर पर्यटकांनी पाठ फिरवल्याने शॅक बंद करण्याची वेळ आली. शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटी (SOWS) च्या मते, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटकांची (Tourist) संख्या कमी असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक बंदची प्रक्रिया सुरु झाली. विशेषत: इस्टर संडेनंतर तर त्यात आणखी भर पडली.

Goa Beach Shacks Closing Early
Goa Tourism: सफर गोव्याची! चोर्ला घाटातून दिसणारा 3 नद्यांचा उगम, पोर्तुगीज पुस्तकात रेखाटलेले गुळ्ळेच्या धबधब्याचे सुंदर चित्र

पर्यटन हंगाम आव्हानात्मक ठरला

दरम्यान, यंदाचा पर्यटन हंगाम (2024-25) सर्वात आव्हानात्मक ठरला. यंदाच्या हंगामात गोव्याला येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोढावल्याने सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला. SOWS चे अध्यक्ष क्रूझ कार्डोझो यांनी सांगितले की, "जर काहीच काम नसेल तर शॅक सुरु ठेवण्यात काय अर्थ आहे?"

पर्यटन हंमागावर परिणाम

दुसरीकडे, यंदाचा पर्यटन (Tourism) हंगाम अनेक गोष्टींना गाजला. पर्यटक आणि स्थानिक शॅक कामगार यांच्यातील वाद, सोशल मीडियावरील गोव्याच्या संदर्भात पसरवण्यात आलेल्या अफवा, समुद्रकिनाऱ्यावरील दोन खून या घटनांममुळे पर्यटन हंगामावर परिणाम झाला. पर्यटकांनी ऐन हंगामात गोव्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली.

"समुद्रकिनारी पर्यटक अजिबात नाहीत. तुम्ही म्हणू शकता की, हा हंगाम जानेवारी ते मार्चच्या मध्यापर्यंत अडीच महिनेच होता, जेव्हा परदेशी चार्टर पर्यटक तिथे होते. आता ते ही येणे थांबले," असे गोवा शॅक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मॅन्युएल कार्डोझो यांनी सांगितले.

मोठ्या आशावादाने सुरु झालेल्या यंदाच्या (2024-25) पर्यटन हंगामात पर्यटकांचा म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने शॅक व्यवसायावर परिणाम झाला.

Goa Beach Shacks Closing Early
Goa Tourism: 'मिडल ईस्ट' मध्ये धमाका! आंतरराष्ट्रीय पर्यटकांसोबत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गोवा पर्यटनाकडून दोहा, मस्कतमध्ये रोड शो

दुसरीकडे मात्र, काही शॅक मालकांनी देशातर्गंत पर्यटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल ही आशा ठेवून 10 जून पर्यंत शॅक सुरु ठेवण्याची परवानगी मागितली आहे. कळंगुट, कोलवा, बागा येथील शॅक मालकांनी 31 मे नंतरही शॅक सुरु ठेवण्याची ही परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com