Goa Beach Shack, Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यात अजूनही 60 टक्के शॅक सुरू! पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात; व्यावसायिकांची गडबड

Goa Beach Shack: हवामान बदल आणि पर्यटकांची घटती संख्या लक्षात घेता काही शॅक मालकांनी आधीच आपले शॅक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sameer Panditrao

पणजी : गोव्यातील पर्यटन हंगाम हळूहळू संपण्याच्या टप्प्यावर असतानाही सुमारे ६० टक्के शॅक अजूनही पर्यटकांसाठी सुरू आहेत, तर उर्वरित ४० टक्के शॅक बंद करण्यात आले असल्याची माहिती अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिली.

हवामान बदल आणि पर्यटकांची घटती संख्या लक्षात घेता काही शॅक मालकांनी आधीच आपले शॅक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा पर्यटन विभागाने यंदा हंगामासाठी एकूण ३४० शॅकना परवानगी दिली होती. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कळंगूट, बागा, अंजुना, पाळोळे, मिरामार, कोलवा यांसारख्या प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक यामध्ये समाविष्ट होते. नोव्हेंबर महिन्यापासून पर्यटकांची संख्या वाढली होती, ज्यामुळे या शॅक व्यवसायाला चालना मिळाली.

सध्या मात्र मॉन्सूनपूर्व वातावरणामुळे समुद्रकिनारी हवामान बदलत आहे. परिणामी काही शॅकमालकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व आर्थिक व्यवहार्यतेच्या दृष्टीने शॅक बंद केले आहेत. मात्र अजूनही ६०% शॅक सुरू असून काही विदेशी पर्यटक व स्थानिक पर्यटक यांचा वावर या शॅकमध्ये दिसत आहे.

दरवर्षीप्रमाणेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश शॅक बंद होतील, अशी शक्यता असून, पर्यटन विभागाकडूनही शॅक बंद करण्याबाबत सूचना लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT