Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte : हंगाम सुरू होण्यापूर्वीच शॅकचे नूतनीकरण

प्राधिकरणाच्या सीमांकनानंतर परवाने देणार

दैनिक गोमन्तक

पणजी : आगामी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच राज्‍यातील शॅकचे परवाने आणि नूतनीकरण परवाने दिले जातील, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. राज्‍यातील पर्यटन हंगाम सुरू होण्यास अवघा दीड महिन्‍याचा अवधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर शॅक वाटप धोरणाविषयी विचारले असता त्‍यांनी ही माहिती दिली. हंगामापूर्वीच शॅकच नूतनीकरण झाल्‍यास संबंधित व्‍यावसायिकांना सोयीचे होईल, असेही ते म्‍हणाले.

सप्टेंबर अखेरपर्यंत शॅक परवान्‍यांचे नूतनीकरण न केल्यास हा व्यवसाय सुरू होण्यास उशीर होईल. याबाबत शॅक ऑपरेटर्सच्‍या मागणीनुसार निर्णय घेण्यात असल्‍याचे मंत्री खंवटे यांनी सांगितले. गोवा किनारी विभाग व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडून शॅकसाठी सीमांकन झाल्‍यानंतर परवाने दिले जातील. तसेच नूतनीकरणही केले जाईल. कारण सीमांकनाशिवाय कोणत्‍याही प्रकारचे कच्चे बांधकाम करता येत नसल्‍याचे ते म्‍हणाले.

राज्‍य सरकारने ठरविल्यानुसार समुद्र किनाऱ्यावरील शॅक परवान्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटी (सॉस) चे सचिव जॉन लोबो यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये परवान्यांचे नूतनीकरण झाल्यास ऑक्टोबरच्या सुरुवातीस शॅकचालकांना व्यवसाय सुरू करता येईल.

कळंगुट, बागा किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

बहुतेक समुद्रकिनाऱ्यावरील शॅक देशी पर्यटकांमुळे चालतात. उत्तर गोव्‍यातील कळंगुट, बागा, हणजूण आदी किनाऱ्यांवर देशी पर्यटकांची अधिक गर्दी असते, असे लोबो यांनी सांगितले. काही वेळा अचानकपणे पडणाऱ्या पावसामुळे हंगाम सुरू होण्यात अडथळे येतात. पावसामुळे शॅक उभारण्यासही उशीर होतो. यामुळे या व्‍यावसायिकांचे आर्थिक नुकसान होते, असे लोबो म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Varsha Usgaonkar: 'गोवा हे माझे घर... गोमंतकीय ही माझी माणसे'! अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी उधळली स्तुतीसुमने

Narendra Modi: गोव्याच्या श्रुती आणि रोहितने जिंकले PM मोदींचे मन! म्हापसा ITIचे टॉपर्स; नवी दिल्लीतील विज्ञान भवनात गौरव

‘तुला गोव्‍याचा राखणदार व्‍हायचे आहे का'? चाकू दाखवला, मारायला सुरुवात केली; हल्ल्‍यादिवशी नेमके काय घडले? काणकोणकरांनी दिला जबाब

Amit Shah Goa: 'पर्रीकरांची आठवण, काँग्रेसला चिमटे, स्वदेशीचा नारा'; अमित शहांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे वाचा..

'बुकवर्म': गोव्याच्या बालवाचनाला नवी दिशा; शंभरहून अधिक शाळांमध्ये 'साक्षरता क्रांती'

SCROLL FOR NEXT