Gauri Achari Murder : गौरी अचारीच्या मारेकऱ्याची गोवा पोलिसांच्या ट्रेनिंगसाठी नेमणूक

जामिनावर सुटलेल्या गौरव बिद्रेची गोवा पोलिसांकडून कमांडो प्रशिक्षणासाठी नेमणूक
Dr. Gauri Achari Murder Case
Dr. Gauri Achari Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Gauri Achari Murder : गोवा पोलिसांचा अजब कारनामा आता समोर आला आहे. गौरी आचारी या तरुणीच्या हत्येच्या आरोपात अटकेत असलेल्या आरोपी गौरव बिद्रेची गोवा पोलिसांकडून कमांडो ट्रेनिंगसाठी नियुक्ती करण्यात आली होती, असं आता समोर आलं आहे. महाराष्ट्रातील एका अत्याचार प्रकरणात आरोपी गौरव बिद्रे जामिनावर असताना ही नियुक्ती करण्यात आली होती. पोलिसांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांमधून मात्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मागच्याच महिन्यात गौरी आचारी या तरुणीच्या निर्घृण हत्येमुळे गोवा हादरला होता. गौरीच्या हत्ये प्रकरणी तिचा प्रियकर आणि फिटनेस ट्रेनर गौरव बिद्रेला पोलिसांनी अटक केली होती. गौरव बिद्रेवर याआधीही महाराष्ट्रात अत्याचाराचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात गौरव जामिनावर आहे. मात्र कोणतीही पार्श्वभूमी न तपासता गोवा पोलिसांनी महिन्याभराच्या 90 दहशतवाद विरोधी पथकाच्या कमांडोच्या प्रशिक्षणासाठी नेमल्याचं आता समोर आलं आहे.

Dr. Gauri Achari Murder Case
गौरी आचारी खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात

या सर्व प्रकरणात पोलिसांनी गौरवची नेमणूक करण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासली होती का याबाबत अस्पष्टता आहे. गोव्यात इतर भाडेकरुंची काटेकोरपणे पार्श्वभूमी तपासणाऱ्या पोलिसांनीच आपल्या सर्वात महत्त्वाच्या अशा दहशतवाद विरोधी पथकाच्या कमांडो प्रशिक्षणासाठी गंभीर गुन्ह्यातील आरोपीची निवड केल्याने हे सर्व प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

तपास अंतिम टप्प्यात

गेल्या जून महिन्यात गोव्याला हादरून सोडलेल्या खांडोळा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका गौरी आचारी हिच्या खूनप्रकरणाचे तपासकाम अंतिम टप्प्यात असून फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून काही अहवाल येणे बाकी आहेत. हा अहवाल हाती मिळाल्यावर संशयित गौरव ब्रिदे याच्याविरुद्ध खुनाच्या तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले जाईल.

नेमकं प्रकरण काय?

गौरी या तरुणीचा गळा आवळून तिचा खून केलेल्या संशयित गौरव ब्रिदे याने कदंब पठारावरील झाडीत तिचा मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणाचा तपास जुने गोवेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी करताना संशयिताला 24 तासाच्या आत अटक केली. त्यानेही खुनाची कबुली दिली. त्यामुळे तपासकामातील साक्षीदार तसेच गौरी व गौरव यांच्यात घटनेच्या शेवटच्या क्षणी मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची तसेच व्हॉटसअप मेसेजिस माहितीसाठी ते फॉरेन्सिक लेबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com