goa tourism development Dainik Gomantak
गोवा

गोवा म्हणजे फक्त Sun, Sand, Sea नाही! पर्यटनमंत्र्यांचा 'गेम-चेंजिंग' मास्टरस्ट्रोक, परशुरामाचा भव्य प्रकल्प बनणार नवी ओळख

Goa Tourism Masterplan: गोव्याचे जागतिक पर्यटन नकाशावरील स्थान बळकट करणे, हा या प्रकल्पांचा उद्देश आहे

Akshata Chhatre

Udaipur Tourism Conference: या आठवड्यात राजस्थान येथे झालेल्या राज्य पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत गोव्याने आपल्या पर्यटन क्षेत्राला 'जागतिक' रूप देण्यासाठी दोन महत्त्वाकांक्षी 'फ्लॅगशिप' प्रकल्पांचे सादरीकरण केले. पर्यटकांचा अनुभव वाढवणे, रोजगार निर्माण करणे आणि गोव्याचे जागतिक पर्यटन नकाशावरील स्थान बळकट करणे, हा या प्रकल्पांचा उद्देश आहे. या बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे पर्यटन मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मांद्रे येथे आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टसाठी 'मेगा अरेना'

गोवा पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांद्रे येथे २०,००० आसनक्षमतेचे एक अत्याधुनिक 'मेगा परफॉर्मन्स अरेना' विकसित करण्यात येणार आहे. हे स्थळ मोठ्या आंतरराष्ट्रीय संगीत मैफिली, अधिवेशने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बहुपयोगी असेल. गोवा आता फक्त 'सन, सँड, सी' डेस्टिनेशन पुरता मर्यादित नाही, तर 'गो गोवा बियॉन्ड बीचेस' या संकल्पनेवर राज्य काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भगवान परशुराम प्रकल्प: सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा

गोव्याने सादर केलेला दुसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे भगवान परशुराम यांची भव्य मूर्ती आणि संग्रहालय हा आहे. कानकोण येथील 'लाइफस्केप प्रोजेक्ट'च्या बाजूला हा प्रकल्प सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित केला जाईल. 'गोव्याच्या पौराणिक वारसा' साजरा करणारा हा प्रकल्प असेल. कथा-कथन क्षेत्रे, निसर्गरम्य दृश्ये आणि क्युरेटेड प्रदर्शनांसह पर्यटकांना एक अनोखा अनुभव मिळेल. यापूर्वी सरकारने धनुष्यबाणाचे एक प्रतिष्ठित स्मारक बांधण्याची योजना जाहीर केली होती. पौराणिक कथेनुसार, भगवान परशुरामांनी बाण मारून अरबी समुद्राला दूर केले आणि त्यातूनच गोव्याची निर्मिती झाली.

'अतिथी देवो भव' - मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे मत

गोवा पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, "गोव्याचा पर्यटन दृष्टिकोन हा आर्थिक वाढीसह पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक कल्याणाचा समतोल साधणाऱ्या पुनरुत्पादक पद्धतींवरआधारित आहे. पेडणे आणि कानकोण येथील आमचे नवीन प्रकल्प गोव्याच्या पर्यटन लँडस्केपची पुनर्व्याख्या करतील. 'अतिथी देवो भव' या तत्त्वज्ञानावर आधारित परिवर्तनकारी अनुभव देण्याचे आमचे लक्ष्य आहे.

सात स्तंभांवर आधारित धोरण

गोव्याने आपले पर्यटन क्षेत्र वैविध्यपूर्ण करण्यासाठी सात स्तंभांवर लक्ष केंद्रित केले आहे: १) इको आणि निसर्ग-आधारित पर्यटन, २) गोव्याचे बॅकवॉटर्स ३) वारसा आणि संस्कृती, ४) MICE पर्यटन, ५) साहसी पर्यटन, ६) विश्रांती आणि मनोरंजन आणि ७) अध्यात्मिक, निरोगी आरोग्य आणि वैद्यकीय पर्यटन. या 'सात स्तंभांवर' आधारित गोव्याचे पर्यटन धोरण आगामी काळात राज्याच्या पर्यटनाचे भविष्य निश्चित करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: गिरीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT