Goa Tourism: टॅक्सी, लॉजिंग, सीफूड झाले स्वस्त! GST कमी झाल्याने गोव्यात खिशाला परवडणाऱ्या पैशात करता येणार पर्यटन

Goa Tourism After GST Reforms: रेस्टॉरंट, पेय पदार्थांचे कियोस्क, बीच शॅक, कॅफे, ज्यूस स्टॉल येथील जीएसटी दर १२ वरुन ५ टक्के करण्यात आले आहेत.
Goa tourism GST reduction | Budget travel Goa
Goa Tourism After GST ReformsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism After GST Reforms

पणजी: सुशेगाद जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोव्याच्या अर्थव्सवस्थेचा पर्यटन हा एक प्रमुख घटक आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे १६ टक्के योगदान आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या जीएसटी कर सुधारणांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. यामुळे गोव्यात लॉजिंग, रेंटल टॅक्सी बाईक, सीफूड, पेय पदार्थ यासह विविध गोष्टींवर स्वस्त होणार आहेत. याचा लाभ पर्यटकांना होणार आहे.

नव्या जीएसटी सुधारणांमुळे गोव्यातील पर्यटन आणि आधारतिथ्य क्षेत्राला बूस्टर मिळणार आहे. या क्षेत्रात मार्च २०२५ मध्ये राज्यातील अडीच लाख लोक कार्यरत आहेत. टॉयलेटरीज, टेबलवेअर आणि नाष्तासाठी आवश्यक वस्तूंवरील जीएसटी १८ वरुन ५ टक्के करण्यात आल्याने यांच्या किंमती ११ टक्के कमी होणार आहे.

याशिवाय पॅकिंग केलेल नारळ पाणी यासंबधित इतर वस्तूंचा समावेश १२ वरुन ५ टक्के क्षेणीत करण्यात आल्याने या वस्तू देखील ६.२५ टक्के स्वस्त होणार आहे, केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Goa tourism GST reduction | Budget travel Goa
Narkasur in Goa: संपूर्ण भारतापेक्षा गोव्याची दिवाळी असते खास! राक्षस वधाने होते पहाट, कुठे पाहाल 'नरकासुर दहनाचा' थरार?
Goa Tourism
Goa TourismPIB

रेस्टॉरंट, पेय पदार्थांचे कियोस्क, बीच शॅक, कॅफे, ज्यूस स्टॉल येथील जीएसटी दर १२ वरुन ५ टक्के करण्यात आले आहेत. या क्षेत्रात आठ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जीएसटी कमी झाल्याने येथील किमती ६.२५ टक्क्यांनी कमी होणार असल्याने खरेदी वाढून लहान विक्रेत्यांना त्याचा फायदा होणार आहे.

Goa Tourism
Goa TourismPIB

राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या टॅक्सी आणि बाईक व्यावसायिकांना देखील जीएसटी सुधारणांचा लाभ होणार आहे. लहान कार (१२०० सीसी) आणि बाईक (३५० सीसी) यावरील कर २८ वरुन १८ टक्के करण्यात आला आहे. राज्यातील टॅक्सी, बाईक रेंटल सुविधांवर राज्यातील जवळपास ४० हजार लोकांची उपजिविका अवलंबून आहे, असे केंद्राच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. जीएसटी कमी झाल्याने वाहनांच्या ऑन रोड टॅक्स कमी होणार असल्याचे म्हटले आहे.

Goa tourism GST reduction | Budget travel Goa
NH 66 Closure: 'ट्रायल रन' फेल! सर्व्हिस रोडवरील गर्दीने पर्वरी हँग; चालकांनी व्यक्त केला तीव्र संताप
Goa Tourism
Goa TourismPIB

जीएसटी सुधारणांचा मत्स्य व्यावसायिक आणि समुद्री खाद्य उद्योगांना देखील फायदा होणा आहे. यात जाळे, खाद्य आणि जल कृषी उद्योगांवरील जीएसटी कमी करुन पाच टक्के करण्यात आला आहे. या वस्तूंवर यापूर्वी १२ आणि १८ टक्के जीएसटी लागत होता. यामुळे क्षेत्रातील वस्तूंच्या किमती ६.२५ आणि ११ टक्के कमी होणार आहेत.

याशिवाय बेकरी आणि पॅकेजड पदार्थ, पेस्ट्री, बिस्कीट, नमकीन, पास्ता, नूडल्स आणि चॉकलेट यांचा आत ५ टक्के जीएसटी श्रेणीत समावेश करण्यात आल्याने यांच्या किमतीत ६.२५ ते ११ टक्के घट होणार  आहे. याचा स्थानिकांसह पर्यटकांनाही मोठा लाभ होणार आहे.

(जीएसटी सुधारणांबाबत केंद्राचे प्रसिद्ध पत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com