New Year Celebration Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: दिलासा! गोव्यात तुडुंब गर्दी; शॅकमालक सुखावले

New Year Celebration : राज्यात नववर्षाच्या जल्लोषी स्वागताची तयारी चालली असून पर्यटन हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. राज्यातील हॉटेल्स आणि विला तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहेत.

Sameer Panditrao

New Year Celebration Goa

पणजी: राज्यात नववर्षाच्या जल्लोषी स्वागताची तयारी चालली असून पर्यटन हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. राज्यातील हॉटेल्स आणि विला तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटन व्यवसायातील सध्याच्या स्थितीबाबत टीटीएजी अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

राज्यातील थ्री-स्टार हॉटेल्स ६०-६५ टक्के फुल्ल झाले असून काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये ही आकडेवारी ८० टक्केपर्यंत पोहोचली आहे. हॉटेल्स आणि विला यांची मागणी वाढली असली तरी राज्यात हॉटेल्सची संख्या पूर्वीपेक्षा खूपच वाढल्यामुळे सर्व हॉटेल्स पूर्णपणे बुक नाहीत, अशी माहिती जॅक सुखिजा यांनी दिली आहे.

पर्यटन क्षेत्रात उत्साह निर्माण झाला असून नववर्षांच्या स्वागतास गोवा सज्ज झाला आहे. गोवाभर नाताळपासूनच नववर्षांचे वेध लागले असून समुद्र किनारे व इतर नववर्षांच्या पार्टीसाठी हॉटेलस सज्ज झाले आहेत. रेल्वे, विमान सेवाही सज्ज असून गोव्यात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे कालपासून समुद्र किनाऱ्यावरही गर्दी दिसत आहे.

शॅक व्यवसायात वाढ

गोव्यातील शॅक व्यवसायात यंदा चांगली वाढ दिसून येत असून जानेवारी महिना व्यवसायासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे संकेत आहेत. यावर्षी व्यवसायात वाढ झाली असली तरी, मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्के घट नोंदवली गेल्याची माहिती शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोझ यांनी दिली. सद्यःस्थितीत पर्यटकांची संख्या आणि व्यवसायाचा ओघ चांगला आहे. जानेवारी महिना हा शॅक व्यवसायासाठी फायदेशीर होईल असे चित्र सध्या आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्स नेहमीच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण राहिले आहेत. जानेवारी महिन्यात पर्यटकांची संख्या अधिक असल्यामुळे व्यवसायाला चांगली चालना मिळेल.

पर्यटन व्यवसाय तेजीत

जानेवारी हा नेहमीच गोव्याच्या पर्यटन व्यवसायासाठी चांगला महिना मानला जातो. सध्याच्या परिस्थितीतही राज्यातील समुद्रकिनारे, नाईटलाईफ आणि पारंपरिक महोत्सव पर्यटकांना आकर्षित करत आहेत. टीटीएजी अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले आहेत. यामुळे गोव्याचा पर्यटन व्यवसाय आणखी तेजीत आहे. हॉटेल्सची वाढती संख्या आणि पर्यटनासाठी असलेली आकर्षणे यामुळे गोव्याला मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे.

पर्यटकांची वाढती संख्या

गोव्यात आता पर्यटक नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल असेही सुखिजा यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, रविवारी संध्याकाळी आलेल्या अहवालांनुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पर्यटन व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र स्पष्ट होते. सध्या गोव्याला येणारे पर्यटक हॉटेल्स आणि विला बुक करून वास्तव्य करत आहेत. विला निवासाचा पर्याय अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करत असल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT