Goa Tourism:'...यामुळे गोव्याची प्रतिमा डागाळली', हॉटेलमधील सुमार सेवेवरून पुणेकराचं CM सावंतांना खुले पत्र

Goa Tourism: २५ ते २९ डिसेंबर या काळासाठी कांदोळी येथील एका हॉटेलचं ऑनलाईन आगोडावरुन बुकिंग केले. पण, येथे आल्यानंतर हॉटेलमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला.
Goa Tourism:'...यामुळे गोव्याची प्रतिमा डागाळली', हॉटेलमधील सुमार सेवेवरून पुणेकराचं CM सावंतांना खुले पत्र
Pune Youth Writes To Goa CMDainik Gomantak
Published on
Updated on

कांदोळी: "ऑनलाईन बुकिंग असताना देखील हॉटेलमध्ये राहण्यास नकार दिला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परवानगी दिली पण, त्यानंतर सेवेच्या नावाखाली मनस्तापच मिळाला", अशी आगपाखड करत पुणेकर तरुणाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना खुले पत्र लिहले आहे.

ओमेश बिराजदार या तरुणाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहून, गोव्यात हॉटेल उद्योगात सुरु असलेल्या बेजबाबदारपणा, अनागोंदी कारभार आणि फसवणुकीच्या प्रकाराबाबत तक्रार केली आहे.

'२५ ते २९ डिसेंबर या काळासाठी कांदोळी येथील एका हॉटेलचं ऑनलाईन आगोडा या प्लॅटफॉर्मवरुन बुकिंग केले. पण, येथे आल्यानंतर हॉटेलमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. तुम्ही आगोडाला पैसे दिलेत आमच्याकडे येऊ नका! असे उत्तर हॉटेल व्यवस्थापकांनी दिले. आम्हाला ताटकळत बाहेर थांबावे लागले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला', असे ओमेशने पत्रात लिहले आहे.

Goa Tourism:'...यामुळे गोव्याची प्रतिमा डागाळली', हॉटेलमधील सुमार सेवेवरून पुणेकराचं CM सावंतांना खुले पत्र
Saint Francis Xavier Exposition: संत झेवियरच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; अवशेष दर्शनाची वेळ 2 तासांनी वाढवली

असाच प्रकार उत्तर प्रदेशातून आलेल्या आणखी एका पर्यटक कुटुंबासोबत घडल्याचे ओमेशने पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रातील पर्यटकाचे देखील बुकिंग फेक असल्याचे हॉटेल व्यवस्थापन म्हणाले. पण, याचवेळी ऐनवेळी येऊन जास्त पैसे देणाऱ्या ग्राहकांना प्राधान्य दिले जात होते, अशी तक्रार ओमेशने पत्रातून केली आहे.

Goa Tourism:'...यामुळे गोव्याची प्रतिमा डागाळली', हॉटेलमधील सुमार सेवेवरून पुणेकराचं CM सावंतांना खुले पत्र
Calangute Beach: गोवा पोलिसांचं 'ऑपरेशन दलाल', कळंगुटला 25 जण ताब्यात

हॉटेलमध्ये कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नव्हते, खुल्यावर सिगारेट ओढणे, मद्य घेणे, असे प्रकार सुरु होते. हॉटेलकडून मिळणाऱ्या सेवेबाबत ओमेशने पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्मवरुन होणारी फसवणूक, हॉटेलमध्ये पर्यटकांना मिळणारी बेशिस्त वागणूक आणि अनादर तसेच, पर्यटकांना मदत कोठून घ्यावी याबाबत नसणारी माहिती, याकडे मुख्यमंत्री सावंतांनी लक्ष द्यावे अशी विनंती ओमेशने पत्रातून केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com