Goa-Dehradun Flight: अखेर गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या गोवा-देहरादून थेट विमानसेवेला मंगळवार २३ मे पासून सुरवात झाली. उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देहरादूनसाठी पहिल्या विमानाने उड्डाण केले.
गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानसेवेचा प्रारंभ झाला. यावेळी बोलताना गोवा-देहरादून विमानसेवेमुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री खंवटे यांनी व्यक्त केला.
यावेळी खंवटे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. आठवड्यातील तीन दिवस मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी ही फ्लाईट असणार आहे. दरम्यान, यावेळी मंत्री खंवटे यांनी विमानातही पाहणी केली. त्यांचे या फ्लाईटमध्ये बसलेले फोटोज व्हायरल झाले आहेत.
उत्तराखंड आणि गोवा ही दोन्ही राज्ये देशभरात पर्यटनासाठी ओळखली जातात. देशभरातील पर्यटकांचा ओढा या दोन राज्यांकडे असतो. चार धाम ही महत्वाच्या यात्रेसाठी उत्तराखंड ओळखले जाते.
याशिवाय विविध मठ आणि मंदिरांसाठी तसेच तलावांसाठी उत्तराखंड सुप्रसिद्ध आहे.
त्यामुळे या दोन शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेमुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा खंवटे यांनी व्यक्त केली.
सोमवारीच याबाबत बोलताना खंवटे यांनी या विमानसेवेसाठी जीएमआर आणि इंडिगो यांनी करार केल्याने दोन्ही ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भ्रमंती करण्यास सोपे जाईल, असे म्हटले होते.
यासंदर्भात सामंजस्य करार करण्यासाठी गोव्यातील एक पथक देहरादूनला रवाना होणार आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.