Deviya Rane : पर्येत नर्सिंग कॉलेजसाठी प्रयत्न करणार

14 व्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद, 310 जणांनी केली तपासणी
Diviya Rane
Diviya RaneGomantak Digital Team

Deviya Rane : राज्यात उत्तर व दक्षिण गोव्यात नर्स काॅलेज सुरु करण्यात येणार असून पर्ये मतदार संघात एक काॅलेज असेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. सर्व सोपस्कार लवकरच पुर्ण होणार आहेत. त्यामुळे येथे शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर राज्यात जाण्याची गरज पडणार नाही. शिक्षण असो व इतर सुविधा देण्याचा प्रयत्न जनतेसाठी आहे. त्याचबरोबर पर्ये मतदार संघाला आयुष इस्पितळ देण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत, असे पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

पर्ये सत्तरी येथे श्री भुमिका विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या आरोग्य तपासणी शिबिरात बोलताना केले. या शिबिराला चांगला प्रतिसाद, लाभला असून यात ३१० जणांनी आरोग्य तपासणी केली. राणे म्हणाल्या की, आरोग्य सेवा तुमच्या दारात आणून सामान्य माणसांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक संधी दिली जात आहे.आरोग्यमंत्री सर्व सामान्यांचा विचार करीत असून चांगल्यातली चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Diviya Rane
Akshay Kumar - Raveena : "मग माझ्या आयुष्यात काय कमी आहे"? अक्षयसोबतच्या ब्रेक-अपनंतर रवीनाने स्वत:ला असं समजावलं...

या आरोग्य शिबिराचा फायदा सर्व सामान्यांनी करुन घेतला पाहिजे. दिवसेंदिवस ताण तणाव वाढत आहे. अश्या वेळी ध्यान, व्यायाम याकडे आपले लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आरोग्याची काळजी स्वतःच घेतली पाहिजे.यावेळी सरपंच रती गावकर, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ गीता काकोडकर, विनोद शिंदे, वाळपई सामाजिक रुग्णालयाचे डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. शॉन डिसिल्वा, साखळी आरोग्याधिकारी डाॅ. अतुल पै, डाॅ. अमिता देशमुख, श्री भुमिका विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सावंत तसेच पंच सदस्यांची उपस्थिती होती.

Diviya Rane
Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ब्रेड वडा

दरम्यान, या शिबिरामध्ये जनरल तपासणी, मेडिसिन, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, नेत्र चिकित्सक, स्तन कॅन्सर तपासणी, अस्तिररोगतज्ज्ञ, दंत चिकित्सक, आयुष आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करण्यात आल्या. तसेच यावेळी रक्त तपासणी, औषधे पुरवठा करण्यात आला.

Diviya Rane
Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ब्रेड वडा

एएसजी नेत्र रुग्णालयची सेवा

गोव्यातील नामांकीत एएसजी नेत्र रुग्णालयाची सेवा सत्तरीतील जनतेला होत आहे. त्याचा लाभ नागरिकांनी करून घेतला पाहिजे. पूर्वी डोळ्यांची मोठी शस्त्रक्रिया किंवा इतर उपचार चेन्नई व इतर राज्यांत घ्यावे लागत होते. मात्र एएसजी इस्पितळामुळे आता रुग्णांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. मेडीकल कॅम्पच्या माध्यमातुन अनेकांना मोफत चष्मे सुध्दा उपलब्ध करुन दिलेले आहेत. वाळपईतील सॅटेलाईट इस्पितळामुळे दर दिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com