Goa Tourism Minister Meets Union Minister Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याच्या कॉन्सर्ट इकॉनॉमी उपक्रमाला मिळणार चालना; पर्यटनमंत्र्यांनी घेतली केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट

Goa Tourism Development: गोव्याच्या पर्यटन उद्योगाच्या व्यापक विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एमआयसीई टुरिझम व्हिजनच्या अनुषंगाने सरकारकडून पुढाकार घेतला जात आहे.

Manish Jadhav

नवी दिल्ली: गोव्याच्या पर्यटन उद्योगाच्या व्यापक विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एमआयसीई टुरिझम व्हिजनच्या अनुषंगाने सावंत सरकारकडून पुढाकार घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची दिल्लीमध्ये सदिच्छा भेट घेतली.

कॉन्सर्ट इकॉनॉमी

दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. गोव्यातील पर्यटन (Tourism) व्यवसायात कॉन्सर्ट इकॉनॉमी (Concert Economy) उपक्रमाची व्याप्ती, त्याचे स्थानिक पातळीवर होणारे परिणाम आणि यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मंत्री शेखावत यांनी या उपक्रमाचे स्वागत करत पाठिंबाही दर्शवला. शेखावत म्हणाले की, "गोवा हा केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरता मर्यादित नसून त्याच्या सांस्कृतिक आणि वारसा पर्यटनाला उभारी देण्यासाठी शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज आहे."

नव्या संधी उपलब्ध होणार

गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात आयकॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सद्वारे सांस्कृतिक आणि वारसा पर्यटनाला चालना दिली जात आहे. या प्रकल्पांमुळे केवळ पर्यटकांचा अनुभव समृद्ध होणार नाहीतर स्थानिक कलाकार, उद्योजक आणि व्यावसायिक यांना नव्या संधी उपलब्ध होतील.

पर्यटनाचा समतोल विकास

मंत्री खवंटे यांनी यावेळी सांगितले की, “पर्यटनाच्या वेळापत्रकानुसार स्थानिक कार्यक्रमांचे नियोजन केल्यास स्थानिकांचा सहभाग वाढवण्यासोबत पर्यटनाचा समतोल विकास साधता येईल.” खवंटे यांनी यावेळी केंद्रीय मंत्र्यांकडून मिळालेल्या पाठिंब्या आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.

मंत्री खवंटे यांची महत्त्वाची बैठक

गोव्याच्या (Goa) पर्यटन धोरणात आता MICE टुरिझम, वारसा पर्यटन आणि शाश्वत विकास या घटकांनाही महत्त्व दिले जात आहे. दरम्यान मंत्री खवंटे यांची ही भेट गोव्यातील पर्यटन क्षेत्राच्या दीर्घकालीन योजनांसाठी महत्त्वपूर्ण मानली जात असून केंद्र-राज्य समन्वयाद्वारे या उपक्रमांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कॉन्सर्ट इकॉनॉमी म्हणजे काय?

गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय स्टार्सच्या संगीत मैफिलींचा ट्रेंड देशात वाढला आहे. कॉन्सर्टद्वारे हॉस्पिटॅलिटी, मर्चेंडायझिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट यासारख्या अनेक उद्योगांना चालना मिळण्यासोबत मोठा महसूल मिळतो. याशिवाय, पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळते.

MICE म्हणजे काय?

एमआयसीई (Meetings, Incentives, Conferences and Exhibitions) चा अर्थ बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन असा होतो. MICE हे पर्यटन व्यवसाय क्षेत्रापैकी एक आहे. हे क्षेत्र सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. MICE पर्यटनाचे देशासाठी अनेक फायदे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT