Goa Hinterland Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Tourism: पावसाळ्यात गोव्यात पर्यटन सफर किती सेफ? पाच महत्त्वाचे पॉइंट्स

Tips For Monsoon Tourism In Goa: पावसाळा सुरु झाला की आपोआप पाऊले गोव्याच्या दिशेने वळतात. पर्यटक पावसाळ्यात मोठी गर्दी करतात.

Manish Jadhav

पावसाळा सुरु झाला की आपोआप पाऊले गोव्याच्या दिशेने वळतात. पर्यटक पावसाळ्यात मोठी गर्दी करतात. तुम्हीही जर पावसाळ्यात गोव्याला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

पण पावसाळ्यात समुद्र किनाऱ्यांवर जाताना निष्काळजीपणा करुन चालणार नाही. कारण तुमचा हा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमची ट्रीप अविस्मरणीय करायची असेल तर या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे.

दरम्यान, गोव्यात (Goa) जुलै महिन्यात मोठ्याप्रमाणात पाऊस पडतो. याच महिन्यात पर्यटकही गोव्यातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी गर्दी करतात. तुम्हाला तुमची गोवा ट्रीप सफल करायची असेल तर काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. चला तर मग गोव्याला गेल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया...

ड्रिंक टाळा

अनेकजण पावसाळ्यात पिकनीकला जाताना ड्रिंक करतात. ड्रिंक केल्यानंतर आलेल्या नशेत अनेकजण नदीत, समुद्रात पोहण्यासाठी जातात. अनेकजण तर स्विमिंग येत नसूनही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नदीत उड्या घेतात. मग पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडतात.

शो ऑफ करु नका

अनेकजण गोव्यात शो ऑफ करण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी नदीत, समुद्रात फिल्मी स्टाईलने उड्या घेतात. बाईकवरुन स्टंट करतात. पण या गोष्टी तुम्हाला महागात पडू शकतात.

कुणी सांगतंय म्हणून

नदीत, समुद्रात उडी मारायला किंवा डोंगराच्या टोकावर जाऊन उभे राहण्यासाठी कुणी जर तुम्हाला फोर्स करत असेल आणि मोठेपणा म्हणून तुम्ही मोठ्या जोशात असं काही करत असाल तर सावधान व्हा.

बीचवर जाताना कोणती काळजी घ्यावी

किनाऱ्यांना (Beach) भेट देणार्‍यांना समुद्रातला खडकाळ भाग व उंचवटे अशा ठिकाणी जाण्यास मनाई केली जाते. पावसाळ्यात (Monsoon) हे भाग धोकादायक निसरडे बनलेले असतात.

लाटांची उंची, तीव्रता यामुळे पाण्यात जाणाऱ्या व्यक्तींना, उग्र बनलेल्या समुद्रात सहजपणे खेचला जाऊ शकतो.

सरकारच्या गाइलाइन्स

पावसाळ्यात कोणती ठिकाणे सुरक्षित आहेत आणि कोणती नाहीत हे पाहावे. त्याचबरोबर सरकारने दिलेल्या गाइडलाइन्सही पाहिल्या पाहिजेत.

धबधब्यावर जाणे टाळावे

धोकायदायक धबधब्यांवर (Waterfalls) जाणे टाळावे. तुम्ही कोणते धबधबे सुरक्षित आहेत आणि कोणते धबधबे धोकादायक आहेत हे पाहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

SCROLL FOR NEXT