Goa tourism kerala entry Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Kerala: गोव्याच्या पर्यटनात केरळची ‘एन्ट्री’! टॅक्सी व्यावसायिकांपुढे मोठे आव्हान; विश्रांती पर्यटनाकडे पाऊल

Goa tourism kerala entry: एका ठिकाणची टॅक्सी दुसरीकडे पर्यटकांना घ्यायला गेल्यावर होणारे वाद शमण्याच्या मार्गावर असतानाच आता टॅक्सी व्यावसायिकांपुढे केरळ सरकार आव्हान उभे करणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एका ठिकाणची टॅक्सी दुसरीकडे पर्यटकांना घ्यायला गेल्यावर होणारे वाद शमण्याच्या मार्गावर असतानाच आता टॅक्सी व्यावसायिकांपुढे केरळ सरकार आव्हान उभे करणार आहे. केरळच्या राज्य परिवहन महामंडळाने गोव्यात पर्यटक आणण्याची सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे.

या महामंडळात पर्यटन सेवा विभाग आहे. त्या विभागातून केरळ परिवहन महामंडळाच्या बसमधून कासारगोडपर्यंत पर्यटक आणण्यात येणार आहेत. तेथून खासगी बसने त्यांना गोव्यात फिरविले जाणार आहेत. या पर्यटकांसाठी हॉटेल्सचे आरक्षण केरळ पर्यटन विकास महामंडळ करणार आहे.

केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बजेट पर्यटन उपक्रमाला प्रारंभी मिळालेल्या यशानंतर आता या उपक्रमाचा विस्तार करण्यात येत असून गोव्यासाठी एक आकर्षक फ्लॅगशीप पॅकेज सादर करण्यात येत आहे. तीन रात्री आणि दोन दिवसांचा हा प्रवास राज्य परिवहनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत असून पारंपरिक मंदिर पर्यटनाच्या पलीकडे जाऊन उच्च मागणी असलेल्या विश्रांती (लेझर) पर्यटनाकडे टाकलेले पाऊल मानले जात आहे.

परवडणारी किंमत आणि आराम यांचा समतोल राखण्यासाठी प्रवास दोन टप्प्यांत विभागला आहे. प्रवासी प्रथम केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसने कासारगोडपर्यंत प्रवास करतील. त्यानंतर तेथून पुढील सीमापार प्रवासासाठी खासगी लक्झरी एसी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.

बजेट पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी महामंडळाने केरळ टुरिझम डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह सोसायटीसोबत भागीदारी केली असून या माध्यमातून दर्जेदार हॉटेल निवासाची सुविधा देण्यात येणार आहे. दरम्यान, गोवा पर्यटन पॅकेजच्या तिकिटांच्या किमती निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

कशी आहे पॅकेजची रचना?

या पॅकेजची रचना सर्वसमावेशक अनुभव देण्यासाठी केली आहे. यामध्ये गोव्यात सूर्यकिरणांनी न्हालेल्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद, युनेस्कोच्या यादीतील ऐतिहासिक वारसा स्थळांची भेट, तसेच जगप्रसिद्ध नाईटलाईफ आणि गोवन खाद्यसंस्कृतीचा अनुभव यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'मॅन ऑफ द मोमेंट'! ईशान किशनचा मोठा शॉट फसला, मार्को यान्सननं बाऊंड्री लाईनवर घेतला भन्नाट कॅच; चाहतेही अवाक

सोन्याच्या किमतीत तेजीचं 'महावादळ', दीड लाखांचा टप्पा फत्ते! गुंतवणूकदारांची चांदी, तर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Horoscope April 2026: एप्रिल महिना 'या' राशीसाठी ठरणार 'लकी'! अविवाहितांसाठी सनई-चौघड्यांचे शुभ संकेत; जाणून घ्या ग्रहांची बदलती स्थिती

IPL 2026: "वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर प्रतिस्पर्धी ढेर, राजस्थान फायनलमध्ये जाणारच", दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

IPL 2026 Points Table: मुंबई-चेन्नई तळाला! पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा दबदबा, आरसीबी बॅकफूटवर; पंजाब किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण

SCROLL FOR NEXT