goa destination.jpg 
गोवा

Goa Tourism: पर्यटनस्थळे खुली करण्याबद्दल सरकारने दिली महत्वाची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी:  देशात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्यानंतर सुरुवातीला या संकटापासुन दुर असलेल्या गोव्यात नंतर मात्र गंभीर परिणाम दिसले. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने 'सुरक्षित गोवा' ही प्रतिमा मलिन झाली आहे. राज्याची प्रतिमा उजळण्यासाठी आता सरकारने मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली पाहिजे, असे टूर ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवाने सरकारला निवेदनाद्वारे सुचवले आहे. (Important information given by the government about opening tourist destinations in Goa)

टूर ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशन संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन या सुचना केल्या आहेत. त्यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आणि गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांतून दिली गेली पाहिजे. यात ऑक्सिजनची उपलब्धता, लसीकरण, कोविड चाचण्यांसाठी त्वरित सुरु केलेली केंद्रे, रुग्ण बरे होण्याचे सुधारलेले प्रमाण, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींवर भर दिला पाहिजे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांची भेट घेतल्यानंतर शिष्टमंडळाचे अध्यक्ष निलेश शहा यांनी माध्यामांना सांगितले की, “पर्यटन क्षेत्र खुले करण्यास सरकार सकारात्मक आहे.” “सध्या हॉटेल्स बंद नाहीत, परंतु केसची सकारात्मकता दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल तेव्हा सरकार उद्योग सुरू करण्यास पूर्ण परवानगी देईल.” असे सरकारकडुन सांगण्यात आल्याचे समजते आहे. 

या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष नीलेश शहा यांच्यासह फ्रांसिस ब्रागांझा, अर्नेस्ट डायस, विल्सन रमोस, गिट्री वेल्हो, जॅक सुखिजा, साईराम धोंड, आकाश मडगावकर आदींचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT