पणजी: गोवा पर्यटन विभागाने २०२५ च्या पहिल्या तिमाहीत पर्यटक आगमनात १०.५ टक्के वाढ नोंदवली आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत गोव्यात २८,५१,५५४ पर्यटकांनी भेट दिली, तर २०२४ मध्ये ही संख्या २५,८०,१५५ होती.
ही वाढ गोव्याच्या हंगामी किनारपट्टी पर्यटन स्थळाच्या प्रतिमेतून जागतिकदृष्ट्या संलग्न, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व वर्षभर चालणाऱ्या पर्यटन अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाचे स्पष्ट लक्षण आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये प्रचार वाढवल्यामुळे, आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क विस्तारल्यामुळे हे शक्य झाल्याचे देखील विभागाने नमूद केले आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने दुबई व्यतिरिक्त आता गोव्याला थेट कुवेत आणि अबूधाबीशी जोडले आहे. हे यश विमान कंपन्यांसोबत सातत्यपूर्ण संवाद आणि ट्रान्झिट बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे शक्य झाले. डब्ल्यूटीएम लंडन, आयटीबी आशिया (सिंगापूर), ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा, आणि अलीकडेच पार पडलेला एटीएम दुबई यामध्ये गोवा पर्यटनाची उल्लेखनीय उपस्थिती होती. डब्ल्यूटीएम लंडनमध्ये ‘चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा इनिशिएटिव्ह’ अंतर्गत गोवाने सक्रिय सहभाग घेतला.
राज्याने ‘एकादश तीर्थ’ धार्मिक सर्किट, आयुर्वेद व वेलनेस रिट्रीट्स, खेड्यांमधील पर्यावरण-स्नेही अनुभव, आणि पावसाळी पर्यटन संधी यावर भर देत ‘बीच-बियॉन्ड’ दृष्टिकोनातून पर्यटन उत्पादनांचे विविधीकरण केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम जसे दीपपर्व, रापोंणकाराचो सीफूड फेस्टिव्हल, चिखल कालो, सांजाव, फेस्टाविस्ता, स्पिरिट ऑफ गोवा व हेरिटेज फेस्टिवल्स मुळे पर्यटकांत गोव्याची ओढ निर्माण झाली आहे.
पहिल्या तिमाहीतील यशस्वी वाटचाल कोणताही योगायोग नसून सखोल भागीदारी, दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रचार मोहिमांचा परिणाम आहे, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. सध्याच्या बदलत्या घडामोडींवर लक्ष ठेवत, आमचे लक्ष्य स्पष्ट आहे. गोव्याला एक शाश्वत आणि अनुभवात्मक पर्यटन स्थळ बनवणे हे आमचे ध्येय असल्याचेही खंवटे यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.