Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'गोव्यात पर्यटन भरभराटीला येत आहे'! खंवटेंनी सादर केली आकडेवारी; देशांतर्गत 39.48% वाढ

Tourist In Goa: गोवा पूर्वीपेक्षा अधिक मजबूतीने पुढे आला आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते, की गोव्यात पर्यटन भरभराटीला येत आहे,’ असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात कोविडनंतर पर्यटन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचे दर्शन घडवण्यासाठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत महामारी पूर्वीच्या आकडेवारीसह तुलनात्मक विश्लेषण सादर केले.

२०१९ मध्ये गोव्यात ७१,२७,२८७ देशांतर्गत आणि ९,३७,११३ आंतरराष्ट्रीय पर्यटकांची नोंद झाली होती, जी एकूण ८०,६४,४०० इतकी होती. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ९९,४१,२८५ देशांतर्गत आणि ४,६७,९११ आंतरराष्ट्रीय पर्यटकांची नोंद झाली, जी एकूण १,०४,०९,१९६ झाली.

कोविडपूर्व स्थितीच्या तुलनेत ही देशांतर्गत पर्यटनात ३९.४८ टक्के वाढ आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात ५० टक्के सुधारणा दर्शवते. ‘गोवा पूर्वीपेक्षा अधिक मजबूतीने पुढे आला आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते, की गोव्यात पर्यटन भरभराटीला येत आहे,’ असे मंत्री खंवटे यांनी सांगितले. पर्यटन क्षेत्रात सुरू असलेल्या चांगल्या कामाबद्दल आमदार लोबो यांनी पर्यटनमंत्र्यांचे कौतुक केले.

त्यांनी असेही सांगितले, की पर्यटन खात्याने विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाशी (एफआरआरओ) संपर्क साधला आहे आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमनाचा डेटा लवकरच औपचारिकरित्या समाविष्ट केला जाईल.

गोव्यात पर्यटन योग्य दिशेने वाटचाल करत आहे, असे सांगताना मंत्री खंवटे यांनी, सर्व भागधारक आणि गोव्यातील लोकांना या क्षेत्राला वाढीला पाठिंबा देण्याचे आणि निराधार नकारात्मकतेचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले आहे.

सहा महिन्यांत ५७,१२,७५८ पर्यटकांची गोवा सफर

यंदा जानेवारी ते जूनदरम्यान राज्यात एकूण ५७,१२,७५८ पर्यटकांचे आगमन झाले.

यामध्ये ३४,६४,४९० पर्यटक दाबोळी विमानतळावरून तर २२,४८,२६८ पर्यटक मोपा विमानतळावरून आले.

आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ३,२५,८३५ होती, ज्यामध्ये १,१५,६४५ पर्यटक दाबोळी आणि २,१०,१९० पर्यटक मोपा विमानतळावरून आले.

हॉटेलमधील व्याप्ती वर्षभर ७० ते १०० टक्के राहिली.

इन्फ्लुएंसरनी खोट्या बातम्या पेरल्या

राज्याबाहेरून चुकीची माहिती पसरवणाऱ्या ‘पेड इन्फ्लुएंसर’वर मंत्री खंवटे यांनी कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, की हे इन्फ्लुएंसर खोट्या बातम्या पसरवण्यासाठी पैसे घेतात; परंतु जेव्हा आम्ही अधिकृत डेटा सादर केला, तेव्हा त्यापैकी कुणीच प्रतिकार केला नाही. पर्यटकांमध्ये घट झाली असेल तर पुरावे दाखवा. आमच्याकडे लपवण्यासाठी काहीही नाही, आकडे स्वतःच बोलतात, असे ते म्हणाले.

नव्या बाजारपेठांमध्ये गोव्याचा प्रवेश

खंवटे यांनी गोव्याच्या वाढत्या जागतिक पोहोचेबद्दलही सांगितले. त्यांनी अधोरेखित केले, की राज्याने पोलंड, उझबेकिस्तान आणि कझाकस्तानसारख्या नवीन पर्यटन बाजारपेठांमध्ये प्रवेश केला आहे. उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय जाहिरातींमुळे हे संबंध वाढण्यास मदत झाली आहे. गोवा आता जगाच्या अनेक भागांशी जोडलेला आहे. रोड शो आणि मार्केटिंग मोहिमांसारख्या प्रयत्नांमुळे पूर्वी नसलेले पर्यटन विभाग देखील आता खुले झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT